पिंपरी चिंचवड ( क्रांतीकुमार कडुलकर) - पिंपरी-चिंचवड महापालिका व जिल्हा क्रीडा परिषद, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हा डॉजबॉल स्पर्धा उत्साहात पार पडली. ही स्पर्धा एच. ए. स्कूल, पिंपरी येथे आयोजित करण्यात आली होती.
स्पर्धेचे उद्घाटन शाळेच्या उपमुख्याध्यापिका सुजाता कोरके, आशा माने, तसेच क्रीडाधिकारी रंगराव कारंडे यांच्या उपस्थितीत झाले. प्रास्ताविक क्रीडा समन्वयक कन्हेरे यांनी केले. यावेळी क्रीडाशिक्षक मुकेश पवार, हनुमंत सुतार आणि शिवाजी मुटकुळे यांनी संपूर्ण कामकाज पाहिले. पंच म्हणून रामेश्वर हराळे (सचिव – डॉजबॉल संघटना, पिंपरी-चिंचवड) व त्यांच्या टीमने जबाबदारी पार पाडली.
स्पर्धेत खेळाडूंनी चुरशीचे सामने खेळून प्रेक्षकांची मने जिंकली. त्यातील प्रमुख निकाल पुढीलप्रमाणे:
१७ वर्षे वयोगट – मुले
प्रथम: एच. ए. स्कूल, पिंपरी (गुण: १०)
द्वितीय: शिक्षण प्रसारक मंडळी मराठी माध्यम, निगडी (गुण: ४)
तृतीय: सावित्रीबाई फुले शाळा, मोशी (गुण: ५)
चतुर्थ: एम. एम. विद्यामंदिर, काळेवाडी (गुण: ३)
१७ वर्षे वयोगट – मुली
प्रथम: एच. ए. स्कूल, पिंपरी (गुण: १६)
द्वितीय: विद्यानंद भवन स्कूल, निगडी (गुण: ०)
तृतीय: सेंट पीटर स्कूल (गुण: ५)
चतुर्थ: पीसीएमसी पिंपळे गुरव विद्यालय (गुण: २)
१९ वर्षे वयोगट – मुली
प्रथम: शिक्षण प्रसारक मंडळी मराठी माध्यम, निगडी (गुण: ६)
द्वितीय: एच. ए. स्कूल, पिंपरी (गुण: २)
तृतीय: एम. एम. विद्यालय व ज्युनिअर कॉलेज, काळेवाडी (गुण: ९)
चतुर्थ: सेंट उर्सुला हायस्कूल, निगडी (गुण: १)
या स्पर्धेत एच. ए. स्कूल, पिंपरी ने दोन विजेतेपदे पटकावून आपली भक्कम कामगिरी सिद्ध केली. सर्व विजेत्या संघांचे विशेष अभिनंदन करण्यात आले असून आगामी स्पर्धेसाठी त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.