MGID Header Code
Code End

PCMC : भोसरीत भव्य रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद : १३३ कामगारांचे रक्तदान



पिंपरी-चिंचवड : सीआय इंडिया ऑटोमॅटिक लि., भोसरी व महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ, कामगार कल्याण केंद्र चाकण यांच्या संयुक्त विद्यमाने नवरात्रोत्सवानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरास कामगार वर्गाकडून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

कार्यक्रमाचे उद्घाटन सीआय इंडिया ऑटोमॅटिकचे प्लॅन्ट हेड निवृत्ती बच्छाव, मनुष्यबळ विभागप्रमुख बाळासाहेब पाटील, दत्तात्रय पडवळ व प्रशांत शर्मा यांच्या हस्ते करण्यात आले. या शिबिरात एकूण १५१ कामगारांनी सहभाग नोंदवला, त्यापैकी १३३ कामगारांनी रक्तदान केले.

हडपसर येथील पुणे ब्लड बँकेच्या डॉ. स्नेहल गिरमकर यांनी रक्तदानाचे महत्त्व विशद करताना हिमोग्लोबिनच्या कमतरतेवर मार्गदर्शन केले. या उपक्रमात सीआय इंडिया गणेश मंडळाच्या वतीने प्रत्येक रक्तदात्यास एक स्मार्ट वॉच, प्रमाणपत्र व ट्रॉफी देऊन गौरवण्यात आले.


कामगार कल्याण केंद्र, चाकणचे केंद्र संचालक श्री. अविनाश राऊत यांनी कामगार वर्गाला कामगार कल्याण मंडळाच्या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले. यावेळी विविध आस्थापना व संघटनांना सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी कामगार प्रतिनिधी दत्तात्रय धावडे, सुभाष जमादार, ज्ञानेश्वर कळमकर, दीपक अरगडे व कृष्णदेव थोरात यांनी मोलाचे योगदान दिले. याशिवाय गुणवंत कामगार शंकर नाणेकर व अण्णा जोगदंड यांचेही विशेष सहकार्य लाभले.

शेवटी, अविनाश राऊत यांनी कामगार व अधिकारी वर्गाचे आभार मानून शिबिराची सांगता केली.

थोडे नवीन जरा जुने