MGID Header Code
Code End

बालपणाची पहिली शाळा म्हणजे बालविकासचा पाया आहे. इथे संस्कार आणि ज्ञानाचे पहिले धडे दिले जातात. - क्रांतीकुमार कडुलकर


अंगणवाडी ही प्रामुख्याने ० ते ६ वर्षे वयोगटातील लहान मुले, गरोदर माता, स्तनदा माता आणि किशोरी मुली यांच्या आरोग्य, पोषण व विकासासाठी असते. ही केंद्रे एकात्मिक बाल विकास सेवा योजना (ICDS) आणि मिशन सक्षम अंगणवाडी आणि पोशन 2.0 अंतर्गत चालवली जातात.

प्रमुख लाभार्थी

• ० ते ६ वर्षे वयोगटातील मुले: पूरक पोषण आहार, लसीकरण, नियमित आरोग्य तपासणी आणि ३ ते ६ वयोगटासाठी अनौपचारिक पूर्व-शालेय शिक्षण मिळते.

• गरोदर व स्तनदा माता: पोषण आहार, आरोग्य तपासणी आणि सुरक्षित मातृत्वासाठी मार्गदर्शन दिले जाते.

• किशोरी मुली व कुटुंबे: पोषण, आरोग्य आणि कुपोषण प्रतिबंधाबाबत जागरूकता व मार्गदर्शन केले जाते.

भारतात अंगणवाडी शिक्षणाची सुरुवात १९व्या शतकात झाली. त्या काळात लॉर्ड कर्झन हा भारताचा व्हाइसरॉय होता. त्याच्या काळात किंडरगार्टन पद्धती देशात आली. त्याचा प्रभाव आजही प्राथमिक शिक्षणात दिसतो. १८८७ पासून शिशु शिक्षणाची व्यवस्था सुरू झाली. तेव्हा ५ वर्षांवरील मुलांना शाळेत प्रवेश मिळत असे, पण ४ वर्षांची मुलेही येत असल्याने त्यांच्यासाठी बालोद्यान पद्धतीने शिकवण्यास सुरुवात झाली. या वर्गात गाणी, गोष्टी आणि खेळ यांना महत्त्व दिले गेले. १८९४ मध्ये मॉन्टेसरी पद्धतीची पहिली शाळा मद्रासजवळ अडयार येथे सुरू झाली. या पद्धतीचा प्रसार व्हावा म्हणून गिजुभाई बधेका आणि ताराबाई मोडक यांनी खूप प्रयत्न केले. १८९६ मध्ये मुंबई राज्यात बडोदा जिल्ह्यातील वासते गावात मॉन्टेसरी शाळा सुरू झाली. १९२५ मध्ये भावनगर येथे पहिली मॉन्टेसरी परिषद झाली आणि त्याच वर्षी गिजुभाई व ताराबाई यांनी नूतन बालशिक्षण संघ स्थापन केला. या संस्थेमुळे गावोगावी बालमंदिर आणि शिशुसदन सुरू झाले.

अंगणवाडी ही भारतातील ग्रामीण व शहरी भागात चालवली जाणारी एक महत्त्वाची योजना आहे. देशभरात एकूण १३.७७ लाख अंगणवाडी केंद्रे आहेत, तर महाराष्ट्रात १,०८,००५ अंगणवाडी कार्यरत आहेत.

 यामध्ये १२.८ लाख अंगणवाडी सेविका आणि ११.६ लाख अंगणवाडी मदतनीस काम करतात.

अंगणवाडी ही भारतातील ग्रामीण व शहरी भागात चालवली जाणारी सरकारची  एक महत्त्वाची योजना आहे. देशभरात एकूण १३.७७ लाख अंगणवाडी केंद्रे आहेत, तर महाराष्ट्रात १,०८,००५ अंगणवाडी कार्यरत आहेत.यामध्ये १२.८ लाख अंगणवाडी सेविका आणि ११.६ लाख अंगणवाडी मदतनीस काम करतात.

महाराष्ट्रात एकात्मिक बाल विकास सेवा योजनेची सुरुवात २ ऑक्टोबर १९७५ रोजी झाली. अमरावती जिल्ह्यातील धारणी आणि मुंबईतील धारावी या दोन ठिकाणी ही योजना सुरू झाली. बालकांचे पोषण, आरोग्य, कुपोषण कमी करणे आणि बालमृत्यू टाळणे हे या योजनेचे उद्दिष्ट होते. आज या योजनेचा विस्तार झाला आहे.

अंगणवाडीत खालील सहा सेवा दिल्या जातात:

पूरक पोषण आहार

लसीकरण

आरोग्य तपासणी

संदर्भ सेवा

अनौपचारिक पूर्व शालेय शिक्षण

आरोग्य आणि आहार शिक्षण

सक्षम अंगणवाडीचा ‘पोषण भी पढाई भी’ हा उपक्रम हे समाजाच्या जडणघडणीत आणि तळागाळातील लोकांच्या कल्याणासाठी काम करणारे अत्यंत महत्त्वाचे घटक आहेत, 

प्रशासकीय व कायदेशीर दृष्टिकोनातून त्यांची भूमिका 'मानधनावर काम करणारे स्वयंसेवक' अशी मांडली जात असली, तरी त्यांचे प्रत्यक्ष कार्य एखाद्या समर्पित समाजसेवकासारखेच असते. स्वंयसेवी संस्था आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी अंगणवाड्यामधील  सरकारच्या या महत्वाच्या उपक्रमात आपले योगदान दिल्यास सक्षम अंगणवाडीचा ‘पोषण भी पढाई भी’ हा उपक्रम ईश्वरी कार्य ठरेल. पिंपरी चिंचवड शहरातील अनेक ठिकाणी अंगणवाड्या कार्यरत आहेत. 

क्रांतीकुमार कडुलकर - पत्रकार महाराष्ट्र जनभूमी 


थोडे नवीन जरा जुने