पिंपरी चिंचवड - एक्सलंट इंटरनॅशनल स्कूल, मोशी येथे दिनांक ५ सप्टेंबर रोजी शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
पिंपरी चिंचवड येथील सदानंद एज्युकेशन संस्था यांच्या वतीने हा कार्यक्रम पार पडला.कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी सदानंद एज्युकेशन संस्थेचे सचिव दत्तात्रय शिंदे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून सामाजिक कल्याण एवं मानव संरक्षण संघ चे पुणे जिल्हा अध्यक्ष किशोर थोरात होते, व्यासपीठावर एक्सलंट इंटरनॅशनल स्कूल, मोशी चे प्राचार्य अमोल नेहेरे, सद्गुरूनगर शाखेच्या प्राचार्य वंदना भैरू, भोसरी शाखेच्या उप प्राचार्य संध्याराणी दोरगे व जाधववाडी शाखेच्या प्राचार्य सविता थोरात उपस्थित होत्या.
तर या कार्यक्रमाचे नियोजन संस्थेचे कॉर्डिनेटर किरण शिंदे व मोशी स्टाफ यांनी अतिशय उत्कृष्ठपणे केले होते.
कार्यक्रमाची सुरुवात डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. शिक्षकांनी आपले विचार थोडक्यात व्यक्त केले. या कार्यक्रमास सुमारे नव्वद शिक्षक हजर होते.
शाळेतील शिक्षकांनी विविध कविता, शुभेच्छा संदेश,गाणी म्हणून हा शिक्षक दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
संस्थेच्या वतीने सर्व शिक्षकांचा सन्मान करण्यात आला तर लायन्स क्लब ऑफ पिंपरी चिंचवड यांच्यातर्फे शिक्षकांचे सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
मोशी शाखेचे प्राचार्य अमोल नेहेरे यांचा वाढदिवस हा शिक्षक दिनाच्या दिवशी असल्याने केक कापून अति उत्साहात साजरा करण्यात आला.
या प्रसंगी संस्थेचे सचिव दत्तात्रय शिंदे यांनीआपल्या अध्यक्षीय भाषणात सांगितले की – “शिक्षक हेच खरे राष्ट्रनिर्माते आहेत. विद्यार्थ्यांमध्ये संस्कार, ज्ञान आणि नैतिकता रुजवून ते उज्ज्वल भविष्य घडवतात,शिक्षक हाच शाळेचा आरसा असतो तर संस्थेची प्रगती शिक्षक आणि पालक यांच्यामुळेच होत असते.
सदर कार्यक्रम हा सदानंद एज्युकेशन संस्थेच्या पाच शाखा मिळून आयोजित करण्यात आला होता.
संस्थेचे काम,नियोजन, शिक्षक वर्ग, पालकांचा प्रतिसाद आणि संस्थाचालकांचे उत्तम धोरण बघता सदानंद एज्युकेशन संस्थेचे नाव हे पूर्ण पिंपरी चिंचवड मध्ये
उज्वल होऊन नक्कीच मोठ्या स्थानावर असेल असा विश्वास सामाजिक कल्याण एवं मानव संरक्षण संघ चे पुणे जिल्हा अध्यक्ष किशोर थोरात यांनी व्यक्त केला.