एक हात मदतीचा" उपक्रमाअंतर्गत 100 गोधन दान सेवा..!


अतिवृष्टी आणि पुरामुळे मराठवाड्यासह अनेक जिल्ह्यांतील शेतकरी बांधवांच्या संसारावर संकट कोसळलं आहे. या आपत्तीच्या काळामध्ये "एक हात मदतीचा " उपक्रमाअंतर्गत पहिल्या टप्यात आपण जीवनावश्यक वस्तू व अन्नधान्य स्वरूपात 50 गाड्या मदत पूरग्रस्त 100हुन अधिक गावामध्ये केली आहे.

आता दुसऱ्या टप्प्यात मुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली हिंदुभूषण स्मारक ट्रस्ट पिंपरी-चिंचवड पुणे यांच्या वतीने भाजप प्रदेशाध्यक्ष मा. रवींद्रदादा चव्हाण साहेब यांच्या शुभहस्ते गरजवंत शेतकऱ्यांना शंभर गोधन मोफत दान करण्यात येणार आहे विविध स्वयंसेवी संस्था-संघटना, उद्योजक, व्यापारी क्षेत्रातील संकलित केलेले गोधन पूजन करून पूरग्रस्त भागात रवाना करण्यात येणार आहे या गोधन पूजन सोहळ्याचे वृत्तांकन करण्यासाठी आपला कॅमेरामन,  फोटोग्राफर, पत्रकार प्रतिनिधी पाठवावा, ही विनंती.

 स्थळ : धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज आंतरराष्ट्रीय औद्योगिक प्रदर्शन केंद्र, मोशी, पिंपरी-चिंचवड.

 वेळ  : शुक्रवार,दि. 24 ऑक्टोबर 2025. दुपारी: 3.30 वाजता.

निमंत्रक : 

 आमदार श्री. महेशदादा किसनराव लांडगे,

अध्यक्ष, हिंदूभूषण स्मारक ट्रस्ट, पिंपरी- चिंचवड, पुणे.

थोडे नवीन जरा जुने