पुणे/चिंचवड: शिवतेजनगर येथील श्री स्वामी समर्थ मंदिराच्या १३ व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून श्री स्वामी समर्थ सेवा प्रतिष्ठान, शिवतेजनगरयांच्या वतीने गुरुवारी भव्य रक्तदान आणि महाआरोग्य शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमाला शिवतेजनगर आणि परिसरातील नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
दिवसाची सुरुवात सकाळी ७:३० वाजता श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मंगलमय अभिषेकाने झाली. त्यानंतर सकाळी ९:०० ते सायंकाळी ४:०० या वेळेत आरोग्य सेवा आणि सामाजिक बांधिलकीचे हे दोन्ही उपक्रम राबवण्यात आले.
रुबी हॉल क्लिनिक, पुणे यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात अनेक युवकांनी आणि नागरिकांनी सहभागी होऊन रक्तदान केले. वाढत्या रक्ताची गरज लक्षात घेता या शिबिराचे विशेष कौतुक करण्यात आले. तसेच, डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालययांच्या तांत्रिक सहकार्याने महाआरोग्य शिबिर पार पडले, ज्यामध्ये तज्ज्ञ डॉक्टरांकडून नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली.
या कार्यक्रमाचे मुख्य आयोजक पि.चि.म.न.पा. चे माजी नगरसेवक आणि श्री स्वामी समर्थ सेवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष श्री. नारायण बहिरवाडे होते. यावेळी संस्थेचे विविध पदाधिकारी आणि सेवेकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते, ज्यात प्रामुख्याने:
श्री. शेळके (अध्यक्ष, ज्येष्ठ नागरिक संघ)
श्री. राजू गुणवंत (उपाध्यक्ष, श्री स्वामी समर्थ सेवा प्रतिष्ठान)
सौ. क्षमा ताई (प्रमुख सेवेकरी)
सौ. सारिका रिकामे (कार्याध्यक्ष, महिला मंडळ)
चि. चैतन्य बनकर (अध्यक्ष, युवा मंच)
या सर्वांच्या नियोजनामुळे आणि स्थानिक रहिवाशांच्या सहकार्यामुळे वर्धापन दिनाचा हा सोहळा केवळ धार्मिक उत्सव न राहता एक सामाजिक उत्सव म्हणून साजरा झाला. प्रतिष्ठानच्या वतीने सर्व रक्तदात्यांचे आणि सहकार्य करणाऱ्या संस्थांचे आभार मानण्यात आले.
