स्वामी समर्थ मंदिरामध्ये दिवाळी पहाटचा कार्यक्रम संपन्न....



 पिंपरी चिंचवड : श्री स्वामी समर्थ सेवा प्रतिष्ठान शिवतेज नगर,चिंचवड येथे आज दिवाळीच्या निमित्ताने " स्वर पहाट " या भावगीत भक्तीगीत ' सुगम संगीत या या कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले. दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचे सुरुवात झाली, कार्यक्रमाची सुरुवात गणेश वंदनाने करण्यात आले.

 पद्मनाभा नारायणा, विष्णुमय जग, बोलावा विठ्ठल, जिवलगा कधी येशील रे तू, अवघा रंग एक झाला,अबीर गुलाल, माझे माहेर पंढरी, कानडा राजा पंढरीचा, भूपाळी, गझल, जोगवा इत्यादी संमिश्र गाणी गायली गेली. सादर करते होते, गायक सागर उपासे, मंगेश बुटे  गायिका आर्या फडतरे, पल्लवी केंच, पखवाज शिवनारायण काशीद, तबला रघुवीर केंच, शिंदे साईजर प्रसाद कोठी, निवेदक हेमंत जोशी होते.

कार्यक्रमाचे आयोजन माजी नगरसेवक नारायण बहिरवाडे यांनी केले, प्रास्ताविक राजेंद्र घावटे यांनी केले, सारिका रिकामे यांनी आभार प्रदर्शन केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी राजू गुणवंत, क्षमा काळे, स्नेहा गुणवंत, दीपक पाटील, प्रा. हरि नारायण शेळके, अंजली देव व इतर प्रतिष्ठानच्या सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले.








थोडे नवीन जरा जुने