पिंपरी चिंचवड - दिनांक 13 /11 /2025 रोजी बाबुराव सणस मैदान पुणे येथे खासदार मुरलीधर मोहोळ क्रीडा महोत्सव साजरा करण्यात आला. त्यामध्ये अभिराज फाउंडेशन शाळेतील 9 खेळाडूंनी सहभाग घेतला होता.
या स्पर्धेमध्ये शाळेतील खेळाडूनी 6 मेडल मिळवून पदकांचा वर्षाव केला.
मेडल मिळवलेल्या खेळाडूंची नावे पुढीलप्रमाणे
1) आराध्या ससाने --गोल्ड मेडल
2) अमोद हांडे --गोल्ड मेडल
3) संतोष कोळी --गोल्ड मेडल
4) एकांश जोशी --सिल्वर मेडल
5) स्पंदन उगाडे-- सिल्वर मेडल
6) रुशील मल्होत्रा --ब्रांझ मेडल
या सर्व खेळाडूंच्या यशा बद्दल व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या सर्व शिक्षक व क्रीडा मार्गदर्शक यांचे अभिराज फाउंडेशन चे डायरेक्टर स्वाती तांबे,रमेश मुसूडगे व मुख्याध्यापिका अनिता चव्हाण व सर्व कर्मचारी वर्गांनी अभिनंदन केले आहे.
