जुन्नर (प्रतिनिधी - रफिक शेख) : जुन्नर शहरातील खडक ईस्लामपूरा येथे शनिवारी (२२ नोव्हेंबर २०२५) सायंकाळी हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली. फेरोज शेख यांचा १० वर्षीय मुलगा आणि ५ वर्षीय मुलगी ही दोन्ही भावंडे सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास घरातून बेपत्ता झाली. त्यांच्या आई-वडिलांनी नातेवाईक तसेच परिसरात शोधाशोध केली; मात्र मुलांचा ठावठिकाणा लागला नाही.
मुलांना शेवटचे ईदगाह मैदानाच्या परिसरात खेळताना पाहिल्याची माहिती मिळाली. त्यानुसार नागरिकांनी त्या दिशेने शोध घेतला. सायंकाळी सात वाजता ईदगाह मैदानालगत असलेल्या एका शेततळ्याच्या काठावर दोन्ही मुलांची चप्पल आढळून आली. त्यानुसार तात्काळ नागरिकांऱ्यांनी तळ्यात उतरून शोध घेतला असता, तळ्यात दोन्ही लहान भावंडांचे मृतदेह आढळून आले.
या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. दोन्ही मुले खेळता-खेळता शेततळ्यात पडली आणि पाण्यात बुडून त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचे प्राथमिकदृष्ट्या समजते.
