!-- afp header code starts here --> PCMC : पोलीस निरीक्षक अमोल फडतरे यांचा सामाजिक कल्याण एवं मानव संरक्षण संघातर्फे गौरव

PCMC : पोलीस निरीक्षक अमोल फडतरे यांचा सामाजिक कल्याण एवं मानव संरक्षण संघातर्फे गौरव

 


पिंपरी चिंचवड (क्रांतीकुमार कडुलकर) : सामाजिक कल्याण एवं मानव संरक्षण संघाच्या वतीने चिखली पोलीस स्टेशन येथे शनिवार, दिनांक ३१ जानेवारी रोजी पोलीस निरीक्षक श्री. अमोल फडतरे यांचा सन्मान करण्यात आला. दिनांक २६ जानेवारी रोजी श्री. फडतरे यांना पोलीस शौर्य पदक जाहीर झाल्याबद्दल हा गौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता.

यावेळी श्री. फडतरे यांचा मानाची शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व पेढा देऊन सन्मान करण्यात आला. पोलीस दलातील त्यांची कर्तव्यदक्षता, धाडस व निस्वार्थ सेवाभाव समाजासाठी प्रेरणादायी असल्याचे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले.

या सन्मान कार्यक्रमास सामाजिक कल्याण एवं मानव संरक्षण संघाचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष किशोर थोरात, पुणे जिल्हा अध्यक्ष अमित कोकणे, पुणे शहर जनरल सेक्रेटरी रवींद्र आळणे, पिंपरी-चिंचवड शहर सचिव विनायक जगताप यांच्यासह संघाचे सदस्य तेजस पारखे, अभिजित दिवाने, वैभव हेंद्रे, सारिका यादव, शारदा नारोन्हा, आफ्रिन सय्यद आदी उपस्थित होते.

तसेच संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेश कुंभारे, राष्ट्रीय उपाध्यक्ष तेजस परमार व पश्चिम भारत अध्यक्ष अमोल माने यांनीही पोलीस निरीक्षक अमोल फडतरे यांचे पोलीस शौर्य पदकाबद्दल अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

सामाजिक कल्याण एवं मानव संरक्षण संघ ही संस्था समाजातील दुर्बल घटकांचे संरक्षण, सामाजिक न्याय, महिला व बालकल्याण, मानवाधिकार जनजागृती तसेच विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून समाजसेवेचे कार्य करत आहे. कायदा व सुव्यवस्था राखणाऱ्या कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांचा सन्मान करून समाजात सकारात्मक संदेश देण्याचे कार्य संघ सातत्याने करत असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.

थोडे नवीन जरा जुने