पिंपरी चिंचवड (क्रांतीकुमार कडुलकर): जगातील तिसऱ्या क्रमांकाची आर्थिक महासत्ता म्हणून भारताची अर्थव्यवस्था वेगाने विकसित होत आहे. सन २०४७ मध्ये देशाचा १०० वा स्वातंत्र्यदिन साजरा करीत असताना आपला देश विकसित भारत देश म्हणून जगभर ओळखला जावा, यासाठी आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकार काम करीत आहे. वेगाने विकसित होणाऱ्या भारतीय अर्थव्यवस्थेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राचा प्रथम क्रमांक आहे. यामध्ये सर्वच बाजूने पिंपरी चिंचवड शहराचे देखील मोठे योगदान आहे. स्थानिक स्वराज्य संस्था ते केंद्र सरकारपर्यंत एकाच विचाराचे सरकार असल्यास शहराचा आणि राज्याचा नियोजनबद्ध पद्धतीने वेगाने विकास करता येईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, सभापती राम शिंदे, मंत्री चंद्रकांत पाटील, चंद्रशेखर बावनकुळे, पंकजाताई मुंडे, आमदार महेशदादा लांडगे, शंकर जगताप, उमाताई खापरे, अमित गोरखे, माजी खासदार अमर साबळे, युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष अनुप मोरे, प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे, दक्षिण आघाडी प्रदेशाध्यक्ष राजेश पिल्ले या मान्यवरांनी निवडणूक काळात शहरामध्ये प्रचार सभा गाजवल्या.
त्यामुळे १५ जानेवारी रोजी झालेल्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीला पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत मतदारांनी एक हाती सत्ता देऊन विश्वास व्यक्त केला आहे. मतदारांच्या विश्वासास पात्र ठरून पिंपरी चिंचवड शहर देशात प्रथम क्रमांकाने ओळखले जाईल. यासाठी सर्व आमदार, खासदार, नगरसेवक, पक्ष पदाधिकारी व कार्यकर्ते यांना विश्वासात घेऊन नियोजनबद्ध पद्धतीने आगामी काळात काम करू अशी ग्वाही भाजपा शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांनी दिली.
रविवारी (दि. १८) पिंपरी येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेस यावेळी आमदार महेशदादा लांडगे, अमित गोरखे, माजी खासदार अमर साबळे, युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष अनुप मोरे, प्राधिकरणचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे, दक्षिण भारत आघाडी प्रदेशाध्यक्ष राजेश पिल्ले, शहर प्रवक्ता कुणाल लांडगे, शहर सरचिटणीस ॲड. मोरेश्वर शेडगे, विकास डोळस, मधुकर बच्चे, वैशाली खाड्ड्ये, ज्येष्ठ नगरसेवक शितल उर्फ विजय शिंदे, माजी नगरसेवक राजू दुर्गे, सुजाता पालांडे आदी उपस्थित होते.
यावेळी शत्रुघ्न काटे यांनी पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले की, २००७ च्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये शहरातील नागरिकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली व तत्कालीन शहराध्यक्ष तथा आमदार लक्ष्मण भाऊ जगताप, आमदार महेश दादा लांडगे, माजी खासदार अमर साबळे यांच्या नेतृत्वाखाली पिंपरी चिंचवड मनपा मध्ये भाजपाला बहुमत दिले. त्यानंतरच्या काळात झालेल्या विकास कामांमुळे मतदारांनी भाजपावर विश्वास व्यक्त केला आहे. आता मेट्रोचे विस्तारीकरण, वाहतूक व्यवस्थेत सुधारणा, नियमित पाणीपुरवठा, नदी सुधार योजना, आरोग्य, वैद्यकीय, शिक्षण, कला, क्रीडा, महिला सुरक्षा, कायदा सुव्यवस्था, पर्यावरण अशा सर्व क्षेत्रांमध्ये पिंपरी चिंचवड महानगरपालिका देशात प्रथम क्रमांकाने ओळखली जावी यासाठी नियोजन केले जाईल असे शत्रुघ्न काटे यांनी सांगितले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि सर्व भाजपाच्या आमदार, खासदारांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत भाजपची सत्ता यावी यासाठी अमूल्य मार्गदर्शन केले. आमदार महेश दादा लांडगे, आमदार शंकर शेठ जगताप, आमदार उमाताई खापरे, आमदार अमित गोरखे, माजी खासदार अमर साबळे तसेच प्रदेश कमिटीचे सर्व पदाधिकारी, कोअर कमिटीचे सर्व सदस्य, सर्व माजी नगरसेवक, भाजपाच्या सर्व आघाडीचे अध्यक्ष प्रमुख पदाधिकारी, मंडल अध्यक्ष, बुथ प्रमुख, स्वयंसेवक यांनी सर्वांनी एकत्रित या निवडणुकीत परिश्रम घेतले. त्याची फलश्रुती म्हणून मतदारांनी भारतीय जनता पार्टीवर दाखवलेला विश्वास सार्थ ठरवू असेही शत्रुघ्न काटे यांनी सांगितले.
