!-- afp header code starts here --> दिशा फाऊंडेशनच्या वतीने महापौर रवी लांडगे व नगरसेविका अरुणा लंगोटे यांचा सत्कार

दिशा फाऊंडेशनच्या वतीने महापौर रवी लांडगे व नगरसेविका अरुणा लंगोटे यांचा सत्कार

 


पिंपरी चिंचवड (क्रांतीकुमार कडुलकर) : दिशा सोशल फाऊंडेशनच्या वतीने पिंपरी चिंचवड महानगरपालिकाचे नवनिर्वाचित महापौर रवी लांडगे आणि नगरसेविका अरुणा लंगोटे यांचा नुकताच सत्कार करण्यात आला.

महापौर रवी लांडगे यांनी सत्कारासाठी बुके किंवा इतर भेटवस्तू न देता पुस्तके व वह्यांचे संच द्यावेत, असे आवाहन केले होते. त्यानुसार, दिशा सोशल फाऊंडेशनचे माजी कार्याध्यक्ष सचिन साठे आणि संचालक ॲड. अविनाश ववले यांच्या हस्ते वह्या व शालोपयोगी वस्तू देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच युवा उद्योजक शिवराज काटे यांचादेखील सन्मान कार्याध्यक्ष राजेंद्र करपे यांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी भारतीय जनता पार्टीचे माजी शहराध्यक्ष सदाशिव खाडे, दिशा सोशल फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब जवळकर, माजी अध्यक्ष गोरख भालेकर, संचालक गणेश लंगोटे, राजेश सावंत, शरीफ शेख आदी उपस्थित होते.



अरुणा लंगोटे यांचा विजय म्हणजे सातत्यपूर्ण सामाजिक कार्याची पोचपावती"

दिशा सोशल फाऊंडेशनचे संचालक गणेश लंगोटे यांच्या पत्नी अरुणाताई लंगोटे यांची प्रभाग क्रमांक १४ मधून नगरसेविका म्हणून निवड झाल्याबद्दल फाऊंडेशनच्या वतीने त्यांचा घरगुती स्वरूपात छोटेखानी सत्कार करण्यात आला. मोहननगर येथील संपर्क कार्यालयात हा हृद्य सोहळा पार पडला.

यावेळी संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब जवळकर, कार्याध्यक्ष राजेंद्र करपे, उपाध्यक्ष संतोष बाबर, माजी अध्यक्ष गोरख भालेकर, कोषाध्यक्ष नंदकुमार कांबळे, मा.कार्याध्यक्ष सचिन साठे, संचालक अतुल शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते. सर्व दिशा सभासदांनी त्यांना उज्ज्वल भविष्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.

गणेश लंगोटे हे गेली अनेक वर्षे सामाजिक कार्यात सक्रिय असून त्यांनी हजारो गरजूंना मदतीचा हात दिला आहे. परिसरातील नागरिकांची विविध कामे त्यांनी सातत्याने मार्गी लावली आहेत. त्यांच्या कार्याची दखल घेत मतदारांनी दिलेला कौल हीच त्यांच्या सामाजिक बांधिलकीची पोचपावती असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

सत्कारानंतर मनोगत व्यक्त करताना अरुणा लंगोटे यांनी मतदारांप्रती कृतज्ञता व्यक्त करत, नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध राहणार असल्याचे सांगितले.

थोडे नवीन जरा जुने