महापालिका सार्वत्रिक निवडणूक कालावधीत शहरातील आठही क्षेत्रीय कार्यालयांअंतर्गत व्यापक अतिक्रमण कारवाई....



महापालिका सार्वत्रिक निवडणूक कालावधीत शहरातील आठही क्षेत्रीय कार्यालयांअंतर्गत व्यापक अतिक्रमण कारवाई....

पिंपरी चिंचवड (क्रांतीकुमार कडुलकर) : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीत महापालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५–२६ च्या कालावधीपासून आतापर्यंत  आठही क्षेत्रीय कार्यालयांमार्फत एकूण १४३ अनाधिकृत बांधकामे, १ हजार २६० फ्लेक्स, १३ हजार ९७ केऑक्स, ११५ हातगाड्या, ६० टपर्‍या तसेच २ हजार ९९५ टेबल, वजन काटे, खुर्च्या, बाकडे, झेंडे व इतर साहित्य हटविण्यात व जप्त करण्यात आले आहे, अशी माहिती अतिक्रमण विभागाचे (मुख्यालय) सहाय्यक आयुक्त  तथा क्षेत्रीय अधिकारी अतुल पाटील यांनी दिली.

आयुक्त तथा निवडणूक अधिकारी श्रावण हर्डीकर यांच्या मार्गदर्शनानुसार तसेच अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांच्या नियंत्रणाखाली करण्यात आलेल्या या कारवाईमध्ये अतिक्रमण निरीक्षक, बीट निरीक्षक, महाराष्ट्र राज्य सुरक्षा दलाचे जवान तसेच पोलीस प्रशासन यांच्या संयुक्त पथकांचा समावेश होता.

महापालिका सार्वत्रिक निवडणूक कालावधीत क्षेत्रीय कार्यालयनिहाय करण्यात आलेल्या अतिक्रमण कारवाईची आकडेवारी -

१) अ क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत १३ अनाधिकृत बांधकामे हटविण्यात आली. यासोबतच ४८ फ्लेक्स, ३ हजार १२१ केऑक्स, ३७ हातगाड्या, ३५ टपर्‍या तसेच ४५२ टेबल, वजन काटे, खुर्च्या, बाकडे, झेंडे व इतर साहित्य जप्त करण्यात आले.

२) ब क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत २९ अनाधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यात आली असून ५५७ फ्लेक्स, ३ हजार ५ केऑक्स, ३ हातगाड्या तसेच ४८१ विविध साहित्य जप्त करण्यात आले.

३) क क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत २ अनाधिकृत बांधकामे, २७० फ्लेक्स, १ हजार ९३९ केऑक्स, २ हातगाड्या, १३ टपर्‍या व ४८९ इतर साहित्यावर कारवाई करण्यात आली.

४) ड क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत अनाधिकृत बांधकाम आढळून आले नसले तरी ९६ फ्लेक्स, १ हजार २१५ केऑक्स, १५ हातगाड्या, १ टपरी व १९ इतर साहित्य हटविण्यात आले.

५) इ क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत १ अनाधिकृत बांधकाम, ७१ फ्लेक्स, १ हजार २४१ केऑक्स, २० हातगाड्या, १ टपरी तसेच १ हजार ३१९ इतर साहित्यावर कारवाई करण्यात आली.

६) फ क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत ३५ अनाधिकृत बांधकामे, ६५ फ्लेक्स, ९६७ केऑक्स, १३ हातगाड्या, ३ टपर्‍या व ५७ इतर साहित्य हटविण्यात आले.

७) ग क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत ११ अनाधिकृत बांधकामे, ८५ फ्लेक्स, ५१५ केऑक्स, २३ हातगाड्या, १ टपरी व ५२ इतर साहित्यावर कारवाई करण्यात आली.

८) ह क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत ५२ अनाधिकृत बांधकामे, ६८ फ्लेक्स, १ हजार ९४ केऑक्स, २ हातगाड्या, ६ टपर्‍या व १२६ इतर साहित्य जप्त करण्यात आले.

तरी शहरातील सार्वजनिक रस्ते, पदपथ व मोकळ्या जागांवर अनधिकृतपणे अतिक्रमण करू नये. भविष्यातही नियमभंग करणाऱ्यांविरोधात अशीच कठोर कारवाई सुरू राहणार आहे, असे महापालिका प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे.

थोडे नवीन जरा जुने