दिनांक : 17 फेब्रुवारी 2026 (मंगळवार)
शैक्षणिक वर्ष : 2026–27
स्थळ : महाराष्ट्र
महाराष्ट्र राज्यात RTE 25% अंतर्गत मोफत प्रवेश योजना अंतर्गत इयत्ता पहिलीसाठी शैक्षणिक वर्ष 2026–27 करिता ऑनलाईन प्रवेश अर्ज प्रक्रिया दि. 17 फेब्रुवारी 2026 (मंगळवार) पासून सुरू होत आहे.
या योजनेअंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल व सामाजिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना खासगी विनाअनुदानित शाळांमध्ये 25 टक्के जागांवर मोफत शिक्षणाची संधी दिली जाते. प्रवेश प्रक्रियेदरम्यान होणारी धावपळ टाळण्यासाठी पालकांनी आवश्यक कागदपत्रे आतापासूनच तयार ठेवावीत, असे आवाहन करण्यात येत आहे.
प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रे :
विद्यार्थ्याचे आधार कार्ड
पालकांचे (आई किंवा वडील) आधार कार्ड
विद्यार्थ्याचा जन्माचा दाखला
जातीचे प्रमाणपत्र (पालक किंवा विद्यार्थी)
किंवा
उत्पन्नाचे प्रमाणपत्र (वार्षिक उत्पन्न ₹1 लाखांपेक्षा कमी)
महत्त्वाच्या सूचना :
🛑 ओपन (सर्वसाधारण) प्रवर्गातून अर्ज करताना उत्पन्नाचे प्रमाणपत्र अनिवार्य आहे.
🛑 SC / ST / NT / OBC प्रवर्गातून अर्ज करताना जातीचे प्रमाणपत्र आवश्यक आहे.
🛑 जातीचे प्रमाणपत्र उपलब्ध नसल्यास ओपन प्रवर्गातून अर्ज करून उत्पन्नाचे प्रमाणपत्र सादर करावे.
ऑनलाईन अर्जासाठी संकेतस्थळ :
Maharashtra Education Department
https://student.maharashtra.gov.in/adm_portal/users/login
पालकांनी अधिकृत संकेतस्थळावरच अर्ज भरावा व अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन संबंधित विभागाकडून करण्यात आले आहे.
