पिंपरीत भाजपचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या प्रतिमेला "जोडे मारो आंदोलन"


पिंपरी चिंचवड (क्रांतीकुमार कडुलकर) : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि टिपू सुलतान यांची तुलना करून महाराष्ट्राच्या अस्मितेचा अपमान केल्याच्या निषेधार्थ आज भारतीय जनता पार्टी पिंपरी चिंचवड शहराच्या वतीने पिंपरी चौकात आक्रमक आंदोलन करण्यात आले. यावेळी कार्यकर्त्यांनी सपकाळ यांच्या प्रतिमेला जोडे मारून आपला संताप व्यक्त केला आणि त्यांच्या हकालपट्टीची जोरदार मागणी केली.

शहराध्यक्ष शत्रुघ्न उर्फ बापू काटे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात आमदार उमा खापरे, संघटन सरचिटणीस मोरेश्वर शेडगे, सत्तारूढ पक्षनेते प्रशांत शितोळे, सरचिटणीस वैशाली खाडये, माजी नगरसेवक राजू दुर्गे, युवा मोर्चा अध्यक्ष दिनेश यादव आणि मंडलाध्यक्ष मंगेश धाडगे यांनी आपल्या भाषणातून सपकाळ यांच्या विधानाचा तीव्र निषेध केला. 

"छत्रपती शिवराय हे आमचे आराध्य दैवत आहेत, त्यांची तुलना धर्मांध टिपू सुलतानशी करणे हे ऐतिहासिक अज्ञान असून असा अपमान महाराष्ट्र कधीही सहन करणार नाही.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचा आणि विचारांचा अवमान कोणत्याही परिस्थितीत सहन केला जाणार नाही. महाराष्ट्राच्या अस्मितेशी निगडित असलेल्या या विषयावर आम्ही ठाम आहोत. संबंधितांकडून तात्काळ माफी आणि योग्य ती कारवाई झाली नाही, तर जनतेच्या भावनांचा सन्मान राखण्यासाठी आम्ही लोकशाही मार्गाने अधिक तीव्र आंदोलन उभारू. शिवरायांचा सन्मान अबाधित ठेवणे हीच आमची भूमिका आणि बांधिलकी आहे," असा इशारा यावेळी वक्त्यांनी दिला.

याप्रसंगी हरीश मोरे,युवराज लांडे, देविदास साबळे, कैलास सानप,खंडूदेव काठारे,सतीश नागरगोजे, दिपक नागरगोजे,गणेश ढाकणे,देवदत्त लांडे, डॉ. हेमंत देवकुळे आणि हेमचंद्र मासुळकर यांचीही भाषणे झाली.

आंदोलनात या प्रसंगी विधान परिषद आमदार उमाताई खापरे, शहराध्यक्ष शत्रुघ्न उर्फ बापू काटे , दक्षिण भारत आघाडीचे प्रदेश संयोजक राजेशजी पिल्ले,सत्तारूढ पक्षनेते प्रशांत शितोळे,जिल्हा सरचिटणीस मोरेश्वर शेडगे,वैशाली खाड्ये,मधुकर बच्चे, नगरसेवक अनुराधा गोरखे,विजय उर्फ शीतल शिंदे,सागर गवळी,राजू मिसाळ,डॉ.सुहास कांबळे, कोषाध्यक्ष राजाभाऊ मासुळकर,प्रवक्ते कुणाल लांडगे, राजू दुर्गे,युवा मोर्चा अध्यक्ष दिनेश यादव,मंडल अध्यक्ष मंगेश धाडगे, मोहन राऊत, अनिता वाळूंजकर,अजित कुलथे,विजय शिनकर,मनोज ब्राह्मणकर,गणेश ढाकणे, देवदत्त लांडे, खंडू कठारे, कैलास सानप, मनीष पंजाबी, युवराज लांडे, सतपाल गोयल, देविदास साबळे, नंदू कदम, दीपक नागरगोजे, युवराज ढोरे, सतीश नागरगोजे, बिभीषण चौधरी, नेताजी शिंदे, हरीश मोरे, दिलीप गडदे, शिवदास हांडे, संतोष टोणगे, हेमंत देवकुळे, सचिन उदागे, रवींद्र सानप, रोहित मोखा, सुमित घाटे,राहुल खाडे, साची दोशी, प्रतीक रामगुडे, साईराज भालेकर, ऋषी भालेकर, गोपाल मंडल, दिनेश काटे, मनोज घोडेकर, अभिजित बागुल, आदम मुलाणी, अजय मोरे, उमेश सांडभोर, गौरव शिरुडे, प्रज्योतसिंग हंस, वैभव लंभाते, वरद अंबिके, सुधीर साळूंखे, मयुर काळभोर, जालिंदर काटे, विजय दळवी, ओमकार पवार,निखिल सहाने,संजय परळीकर तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

"सपकाळ यांना पदावरून बडतर्फ करा," अशा घोषणांनी संपूर्ण पिंपरी चौक परिसर दणाणून गेला होता.

थोडे नवीन जरा जुने