PCMC: संत गाडगेबाबा जयंती निमित्त कामगारांकडून अभिवादन.

 


पिंपरी चिंचवड (क्रांतीकुमार कडुलकर)  - संत गाडगेबाबा यांनी गोरगरिबाची सेवा करण्यात आपले जीवन समर्पित केले,वैज्ञानिक दृष्टिकोन असलेले ते समाज सुधारक आणि सामाजिक न्याय सुधारणा, स्वच्छता या विषयांमध्ये जास्त रुची असलेले, अज्ञानाच्या युगात तिलांजली देऊन विज्ञानाच्या जोडीने समाज सुधारण्याचा मूलमंत्र देणारे संत   गाडगेबाबा यांच्या जयंतीनिमित्त कष्टकरी संघर्ष महासंघातर्फे कामगारांकडून विनम्र अभिवादन करण्यात आले.

यावेळी महासंघाचे अध्यक्ष कामगार नेते काशिनाथ नखाते, उपाध्यक्ष राजेश माने, महिलाध्यक्षा माधुरी जलमूलवार, लाला राठोड, रेशमा मोरे, नलिनी कोरे, बिना कांबळे, उज्वला टेंभुर्णी, मंगल पवार, सत्यभामा वाल्हेकर, संजय भोसले आदी उपस्थित होते.

 संत गाडगेबाबांनी आपल्या कीर्तनात उपस्थिताना  विविध प्रश्न विचारून दुर्गुण व दोषांची  जाणीव करून देत उपदेश दिले.  व्यसनाच्या आहारी जाऊ नका, सावकाराकडून कर्ज काढू नका देवधर्माच्या नावाखाली प्राण्यांची हत्या करू नका  अशा पद्धतीने समाज प्रबोधन करणारे राजे बाबा संत गाडगेबाबा व कर्मवीर भाऊराव पाटील यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते असे मत नखाते यांनी व्यक्त केले.

थोडे नवीन जरा जुने