शिवमय जल्लोषात सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात
आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त शिवजन्मोत्सव २०१६ सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक, आरोग्य विषयक उपक्रमांनी आळंदी पंचक्रोशी मध्ये साजरा करण्यात आला.
या वर्षी हि शिवस्वराज्य प्रतिष्ठान, रौद्र शंभो फाउंडेशन, समस्त आळंदी ग्रामस्थ यांच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन उत्साहात करण्यात आले. यावेळी शंभरावर रक्तदात्यांनी रक्तदान करून शिबिर यशस्वी केले. प्रत्येक रक्तदात्यास शिवरायांच्या विचारांची अनोखी पुस्तक भेट देण्यात आली. या शिवाय पोवाडे व शिव गीतांचा कार्यक्रम मंगलमय वातावरणात झाला. यावेळी गाथा हिंदवी स्वराज्याची सादरीकरण करण्यात आले.
श्री ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधीने पुनीत अलंकापुरी नगरीत विविध सेवाभावी संस्था, सर्वपक्षीय संघटना, आळंदीकर, नागरिक, वारकरी भाविक, इंद्रायणी आरती सेवा समिती आळंदी तसेच ज्ञानगंगा इंग्लिश मीडियम स्कूलच्या वतीने शिवजयंती उत्साहात सादरी करण्यात आली. ज्ञानगंगा इंग्लिश मीडियम स्कूलचे प्राचार्य विजय गुळवे यांच्या नियंत्रणात शालेय मुलांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून शिवमय उत्साहात शिवजन्म सोहळा साजरा केला.
आळंदी नगरपरिषदेच्या वतीने नगराध्यक्ष प्रशांत कुऱ्हाडे, मुख्याधिकारी माधव खांडेकर यांच्या सह सर्व नगरसेवक, नगरसेविका यांचे उपस्थितीत श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार व पुष्पांजली अर्पण करून अभिवादन केले. या वेळी शिवाजी महाराज की जय अशा घोषणा देण्यात आल्या. शिवमय जल्लोषात आळंदीत शिवजयंती विविध उपक्रमांनी साजरी करण्यात आली. यावेळी इंद्रायणी आरती सेवा समितीचे वतीने राजमाता जिजाऊ महिला प्रतिष्ठान अध्यक्ष संयोजक अनिता झुजम, संयोजक अर्जुन मेदनकर, सुवर्णा काळे, शोभा कुलकर्णी, अनिता शिंदे, सरस्वती भागवत, कौसल्या देवरे, नीलम कुरधोंडकर, अनुराधा कदम, सुरेखा कुऱ्हाडे, तीर्थराज काळे, शशिकांत राजे जाधव, बाबासाहेब भंडारी, श्रीकांत काकडे, भागवत शेजुळ, अरुण कुरे, माऊली गलबे आदी उपस्थित होते. काँग्रेस तर्फे अध्यक्ष संदीप नाईकरे, नंदकुमार वडगावकर, डॉ. मनोज राका, रामदास दाभाडे, सौरभ गव्हाणे, उमेश कुऱ्हाडे, महादेव पाखरे आदींनी छत्रपती शिवाजी महाराज यांचे पुतळा स्मारकावर पुष्पहार व पुष्पांजली अर्पण करून आदरांजली वाहिली. माजी विरोधी पक्षघटनेते डी.डी.भोसले पाटील, माजी नगरसेवक मृदुल भोसले पाटील यांनी हि पुष्पहार अर्पण करून आदरांजली अर्पण केली.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त शिवस्मारक येथील शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन खासदार संजय उर्फ बंडू जाधव, कृष्णा खोरे विकास महामंडळ संचालक राम गावडे, नगराध्यक्ष प्रशांत कुऱ्हाडे यांनी केले. ढोल-ताशांच्या गजर, जय भवानी, जय शिवाजी नामजय घोष झाला. मुख्याधिकारी माधव खांडेकर, उपनगराध्यक्षा सुजाता तापकीर, माजी नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर, नगरसेविका पुजा घुंडरे, कांचन येळवंडे, ऋतुजा घुंडरे, साक्षी कुऱ्हाडे, नगरसेवक हेमंत कुऱ्हाडे, सागर कुऱ्हाडे, सुरेश झोंबाडे, माजी नगरसेवक अशोक उमरगेकर, भाजपचे सचिव किरण येळवंडे, विवेक घुंडरे आदी मान्यवर उपस्थित होते.
आळंदीत छञपती शिवाजी महाराज जयंती निमित्त रक्तदान शिबीरामध्ये रक्तदान करून हुतात्मा राजगुरू पञकार संघ खेड तालुका अध्यक्ष अर्जुन मेदनकर यांनी सामाजिक बांधिलकी जोपासत रक्तदान श्रेष्ठ दान संदेश देत इतरांना प्रेरणा दिली. रक्तदानाने शिवजयंती उत्सव साजरा करण्यात आला. या वेळी रक्तदान शिबीरामध्ये सहभागी रक्तदात्यास शिवचरित्र पुस्तक आणि सहभागाचे प्रमाणपत्र रक्त डोनेट कार्ड वाटप करण्यात आले. रक्तदान शिबीर दरवर्षी प्रमाणे यावर्षी देखील रक्तदान करणाऱ्या नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेऊन रक्तदान केले.परिसरात शिवप्रेमी बांधवांच्या वतीने उत्स्फूर्त पणे रक्तदानास प्रतिसाद मिळाला. या साठी शिवस्वराज्य प्रतिष्ठान, रौद्र शंभो फाउंडेशन, समस्त आळंदी ग्रामस्थ आणि आळंदी नगरपरिषद यांनी विशेष परिश्रम घेतले.
