आमदार शंकर जगताप यांची भेट व सत्कार


पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत भाजप सत्तेसाठी सिंहाचा वाटा; फेरीवाले-टपरीधारकांच्या प्रश्नांसाठी घेतली मजबूत भूमिका

पिंपरी चिंचवड (क्रांतीकुमार कडुलकर) :  पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत भारतीय जनता पक्षाची (भाजप) सत्ता स्थापन करण्यात चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे आमदार तथा कार्यसम्राट शंकर भाऊ जगताप यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे शहरातील विकास आणि पक्षाच्या मजबुतीसाठी महत्त्वपूर्ण योगदान मिळाले आहे.

या पार्श्वभूमीवर बहुजन कष्टकरी जनता गरजेच्या वतीने राष्ट्रीय अध्यक्ष तथा गोर-गरीब कष्टकरी जनतेचे नेते डॉ. बाबा कांबळे यांनी आज आमदार शंकर भाऊ जगताप यांची भेट घेऊन त्यांचा सत्कार केला आणि मनापासून शुभेच्छा दिल्या. या वेळी टपरी पथारी हातगाडी पंचायत सचिव प्रकाश यशवंत उपस्थित होते.

नुकतीच आमदार शंकर भाऊ जगताप यांनी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या बैठकीत विविध महत्त्वाचे प्रश्न मांडले. यामध्ये शहरातील फेरीवाले, टपरीधारक, पथारी, हातगाडी धारक, फळ-भाजी विक्रेते यांसारख्या घटकांसाठी हॉकर्स झोन (Hawker Zone) निर्माण करण्याची मागणी प्रमुख ठरली. आमदार जगताप यांच्या या स्पष्ट आणि जनहिताच्या भूमिकेमुळे या घटकांमध्ये मोठा आनंद आणि उत्साह संचारला आहे.

डॉ. बाबा कांबळे यांनी यावेळी सांगितले की, “आमदार शंकर भाऊ जगताप यांच्या या भूमिकेचा आम्ही हार्दिक स्वागत करतो. गोर-गरीब कष्टकरी जनतेच्या हक्कांसाठी त्यांनी घेतलेली ही पावले खूपच महत्त्वाची आहेत.”

प्रत्युत्तरादाखल आमदार शंकर भाऊ जगताप यांनी सांगितले की, “पिंपरी-चिंचवड शहरात गोर-गरीब कष्टकरी जनतेच्या बाजूने उभे राहणे आणि त्यांचे प्रश्न सोडवणे हे आमचे प्राधान्य आहे. पुढील बैठकीत डॉ. बाबा कांबळे यांना देखील सहभागी करून घेऊ, जेणेकरून या घटकांच्या समस्या अधिक प्रभावीपणे सोडवता येतील.”

या भेटीमुळे कष्टकरी वर्ग आणि राजकीय नेत्यांमधील संवाद वाढला असून, शहरातील सामान्य जनतेच्या प्रश्नांना अधिक प्राधान्य मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.



थोडे नवीन जरा जुने