!-- afp header code starts here --> दुबईत अडकले पुण्यातील 40 नागरिक; मध्यपूर्वेतील युद्धजन्य परिस्थितीमुळे भीतीचे वातावरण

दुबईत अडकले पुण्यातील 40 नागरिक; मध्यपूर्वेतील युद्धजन्य परिस्थितीमुळे भीतीचे वातावरण

 


पुणे (किशोर थोरात)  पुण्यातून एक चिंताजनक बातमी समोर आली आहे. पुण्याच्या सांगवी परिसरातून दुबईला पर्यटनासाठी गेलेले 40 ज्येष्ठ नागरिक सध्या तेथे अडकले आहेत. मध्यपूर्वेत निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे दुबईहून ये-जा करणाऱ्या अनेक विमानसेवा अचानक रद्द करण्यात आल्याने ही परिस्थिती उद्भवली आहे.

या गटामध्ये सांगवी येथील गायकवाड कुटुंबातील 13 सदस्यांचा समावेश आहे. हे सर्वजण 25 फेब्रुवारी रोजी दुबईला पर्यटनासाठी गेले होते आणि आज भारतात परतण्याचा त्यांचा नियोजित दिवस होता. मात्र, दुबईत अचानक तणावपूर्ण आणि युद्धसदृश परिस्थिती निर्माण झाल्याने अनेक फ्लाइट्स रद्द करण्यात आल्या, त्यामुळे संपूर्ण गट तिथेच अडकून पडला आहे.

सध्या सर्व नागरिक सुरक्षित ठिकाणी असल्याची माहिती आहे. मात्र, दुबईवर होणाऱ्या संभाव्य हल्ल्यांच्या बातम्यांमुळे त्यांच्या कुटुंबीयांमध्ये प्रचंड चिंतेचे वातावरण आहे. कुटुंबीयांचा त्यांच्याशी सातत्याने संपर्क सुरू आहे.

आता प्रशासन यासंदर्भात कधी ठोस पावले उचलते आणि या ज्येष्ठ नागरिकांना कधी दिलासा मिळतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

थोडे नवीन जरा जुने