घरेलू कामगारांना नवीन नियमानुसार लाभ देणार.

 


प्रधान सचिव - कामगार विभाग  आय. ए.कुंदन  यांच्याशी शिष्टमंडळाची सकारात्मक चर्चा.

पिंपरी चिंचवड (क्रांतीकुमार कडुलकर) - महाराष्ट्र राज्य घरेलू कामगार समन्वय समिती, कष्टकरी संघर्ष महासंघातर्फे मुंबई येथे काल आझाद मैदानावर घरेलू कामगारांचा मोर्चा काढण्यात आला. त्यानुसार आज महाराष्ट्र राज्याच्या कामगार विभागाच्या प्रधानसचिव आय ए कुंदन यांचे सोबत पोलिसांनी  शिष्टमंडळाची चर्चा घडवून आणली  यावेळी निवेदन देऊन झालेल्या चर्चा नंतर केंद्र व राज्य शासनाच्या नवीन नियमानुसार घरेलू कामगारांना लाभ देण्यात येतील असे आश्वासन प्रधानसचिव यांनी आज दिले.

दरम्यान  घरेलू कामगारांच्या विविध मागण्या व प्रश्नावर चर्चा करण्यात आली. ईएसआयसी योजना, सामाजिक सुरक्षा, नोंदणी नूतनीकरण प्रक्रिया, मंडळास निधी  यावर सविस्तर चर्चा करण्यात आली.

 यासाठी राज्य शासनाकडून लवकरच प्रस्तावित प्रसिद्धी पत्रक  जाहीर करण्यात येणार आहे असे त्यांनी नमूद केले.

 यावेळी कामगार नेते काशिनाथ नखाते, निमंत्रक राजू वंजारे, श्रमिक चे संतोष विभुते, पुष्कराज शिरधनकर,संतोष थोरात,वंदना चिंचोळकर,शांता खोत, आदी उपस्थित होते .

थोडे नवीन जरा जुने