!-- afp header code starts here --> पिंपळे सौदागर येथील कुणाल आयकॉन रोडच्या कॉंक्रिटीकरण कामाची माजी विरोधी पक्षनेते नाना काटे यांचेकडून पाहणी

पिंपळे सौदागर येथील कुणाल आयकॉन रोडच्या कॉंक्रिटीकरण कामाची माजी विरोधी पक्षनेते नाना काटे यांचेकडून पाहणी

 


पिंपरी चिंचवड : पिंपळे सौदागर येथील कुणाल आयकॉन रोडच्या कॉंक्रिटीकरणाच्या कामाची आज प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली. या पाहणीदरम्यान कुणाल आयकॉन, शुभश्री, साई अवेन्यू आदी सोसायट्यांच्या प्रवेशद्वारांसमोर पावसाळ्यात पाणी साठणाऱ्या ठिकाणी चेंबर उभारून ते स्ट्रॉम वॉटर लाईनला जोडण्याच्या सूचना देण्यात आल्या. तसेच पावसाच्या पाण्याचा सुरळीत निचरा होईल, यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश देण्यात आले.

सदर कामाचा दर्जा, गती आणि नियोजनाचा सखोल आढावा नाना काटे यांनी घेतला.

यावेळी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या स्थापत्य विभागाचे डेप्युटी इंजिनिअर चंद्रकांत मोरे, विद्युत विभागाच्या डेप्युटी इंजिनिअर दिपाली रेडे, विद्युत विभागाचे सल्लागार, स्थापत्य विभागाचे ज्युनिअर इंजिनिअर विवेक गजपुरे, पाणीपुरवठा विभागाचे ज्युनिअर इंजिनिअर अंकुश सयाजीराव, तसेच इन्फ्राकिंग कन्सल्टन्सी इंजिनियर्स प्रा. लि. चे प्रकल्प सल्लागार आर. ई. राकेश पटेल आणि T@T इन्फ्रा लिमिटेडचे प्रोजेक्ट मॅनेजर युवराज आवारे आदी उपस्थित होते.

रस्त्याचे काम पावसाळ्यापूर्वी उच्च दर्जात आणि वेळेत पूर्ण करणे अत्यंत आवश्यक असल्याचे अधोरेखित करत, संबंधित अधिकाऱ्यांना कामाची गती वाढविण्याच्या स्पष्ट सूचना देण्यात आल्या. तसेच कामादरम्यान नागरिकांना कोणताही त्रास होऊ नये, यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश देण्यात आले.

या पाहणीवेळी स्थानिक सोसायट्यांचे चेअरमन, सभासद आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. नागरिकांनी मांडलेल्या समस्या व सूचनांची दखल घेत त्यावर तात्काळ कार्यवाही करण्याचे आश्वासन देण्यात आले.

कुणाल आयकॉन रोडचे कॉंक्रिटीकरण पूर्ण झाल्यानंतर परिसरातील वाहतूक व्यवस्था अधिक सुरळीत होणार असून, नागरिकांना दर्जेदार व सुरक्षित रस्ता उपलब्ध होणार आहे. स्थानिक नागरिकांच्या दैनंदिन जीवनात सकारात्मक बदल घडवून आणणारे हे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी प्रशासन कटिबद्ध असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.

थोडे नवीन जरा जुने