!-- afp header code starts here --> जुन्नर बस स्थानकाची रत्नागिरी विभाग नियंत्रकांकडून पाहणी

जुन्नर बस स्थानकाची रत्नागिरी विभाग नियंत्रकांकडून पाहणी


जुन्नर (रफिक शेख) : हिंदू हृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे सुंदर बस स्थानक स्पर्धेअंतर्गत दि. २८ मार्च २०२६ रोजी जुन्नर बस स्थानकाची पाहणी करण्यात आली. यासाठी रत्नागिरी विभाग नियंत्रक ए. ए. जानराव आणि रत्नागिरी DPO राजेश्वर जाधव यांनी जुन्नर बस स्थानकाला भेट दिली.


यावेळी त्यांच्यासोबत नारायणगाव आगार व्यवस्थापक वसंत अरगडे, ATS तुकाराम पवळे, ATI अशोक खंडागळे, तसेच कर्मचारी पवन भोर, अमित खेडकर, मारुती साबळे आणि गणेश गाढवे उपस्थित होते.

व्हिडिओ


पाहणी दरम्यान विभाग नियंत्रक जानराव यांनी पत्रकार मोहम्मद रफिक तसेच समाजसेवक नवले यांच्यासोबत बस स्थानकाच्या स्वच्छतेसह विविध सुविधांचा आढावा घेतला. प्रवाशांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक त्या सुधारणा करण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

या पाहणीद्वारे बस स्थानकातील स्वच्छता, व्यवस्थापन आणि प्रवासी सुविधा अधिक दर्जेदार करण्यासाठी मार्गदर्शन करण्यात आले.

थोडे नवीन जरा जुने