MCL Recruitment 2026 : महानदी कोलफील्ड्स लिमिटेड (MCL) अंतर्गत विविध पदांसाठी एकूण ६६७ रिक्त जागांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येणार असून अर्ज प्रक्रिया १६ मार्च २०२६ पासून सुरू होणार आहे. इच्छुक उमेदवारांनी ०६ एप्रिल २०२६ (रात्री ११:५० पर्यंत) अर्ज करणे आवश्यक आहे.
या भरतीमध्ये ज्युनियर ओव्हरमन T&S, माइनिंग सिरदार T&S, सर्व्हेअर, ट्रान्सलेटर (OL क्लेरिकल ग्रेड III) आणि टेक्निशियन (पॅथोलॉजी) T&S ग्रेड-C या पदांचा समावेश आहे.
अर्जदार उमेदवारांचे वय ०६ एप्रिल २०२६ रोजी १८ ते ३० वर्षे दरम्यान असणे आवश्यक आहे. यामध्ये SC/ST उमेदवारांना ५ वर्षे तर OBC उमेदवारांना ३ वर्षांची सवलत देण्यात आली आहे.
या भरतीसाठी जनरल, ओबीसी आणि EWS उमेदवारांसाठी ₹११८० परीक्षा फी आकारण्यात येणार असून SC/ST, PWD, माजी सैनिक (ExSM) आणि महिला उमेदवारांसाठी फी माफ करण्यात आली आहे.
निवड झालेल्या उमेदवारांची नियुक्ती ओडिशा राज्यात करण्यात येणार आहे. परीक्षेबाबतची माहिती पुढे जाहीर करण्यात येईल.
इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रांसह दिलेल्या मुदतीपूर्वी ऑनलाईन अर्ज सादर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
-------------------------------------------------
अधिकृत वेबसाईट - येथे क्लिक करा
जाहिरात पाहण्यासाठी - येथे क्लिक करा
अर्ज करण्यासाठी - येथे क्लिक करा
-------------------------------------------------
.png)