!-- afp header code starts here --> पूर्णानगर, चिंचवड येथील एकाच कुटुंबातील तिघांचा मंचर येथे भीषण अपघातात मृत्यू

पूर्णानगर, चिंचवड येथील एकाच कुटुंबातील तिघांचा मंचर येथे भीषण अपघातात मृत्यू


पिंपरी चिंचवड : पूर्णानगर येथील वसुंधरा अपार्टमेंटमधील रहिवासी आर्किटेक्ट कै. मल्लिकार्जुन आंबेगावे (वय ४५ वर्षे), त्यांची पत्नी व त्यांच्या आई यांचे मंचर, पुणे येथे झालेल्या रस्ते अपघातात तिघांचेही दुर्दैवी निधन झाले, ही अत्यंत वेदनादायी व हृदयद्रावक घटना आहे.

मंचर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मल्लिकार्जुन शिवराम आंबेगावे (रा.पिंपरी, पुणे) हे आपल्या कुटुंबासह नाशिकहून पुण्याकडे कार (एमएच १४ डीटी १७७०) ने येत होते. एकलहरे गावाजवळ कारचा ताबा सुटल्याने ती डिव्हायडर तोडून समोरून येणाऱ्या बसला (एमएच १८ बीझेड ४०६७) धडकली. या भीषण धडकेत चालक मल्लिकार्जुन आंबेगावे(वय ४६),त्यांची पत्नी आरती मल्लिकार्जुन आंबेगावे (वय ४२) आणि सासू लता बाळू भूपलोंढे (वय ६३) यांचा जागीच मृत्यू झाला.


बसच्या पुढील बाजूच्या भागाचे नुकसान झाले आहे. अपघाताचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी मागून आलेल्या वाहनाने हूल दिल्याने किंवा टायर फुटल्याने वाहनावरील नियंत्रण सुटल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. 

या अपघाती मृत्यूमुळे पुर्णानगर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

थोडे नवीन जरा जुने