MPSC मार्फत २९७ वैद्यकीय अधिकारी पदांसाठी भरती


MPSC Recruitment 2026 : महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) मार्फत वैद्यकीय अधिकारी, गट-ब पदासाठी २९७ रिक्त जागांची भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीसाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार असून अर्ज करण्याची शेवटची तारीख ०९ एप्रिल २०२६ निश्चित करण्यात आली आहे.

या पदासाठी उमेदवारांकडे M.B.B.S पदवी असणे आवश्यक आहे. अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय १ जुलै २०२६ रोजी १९ ते ३८ वर्षे दरम्यान असावे. मागासवर्गीय, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (आ.दु.घ) तसेच अनाथ प्रवर्गासाठी ५ वर्षांची वयोमर्यादेत सवलत देण्यात आली आहे.

या भरतीसाठी खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी ₹३९४ परीक्षा फी आकारण्यात येणार असून मागासवर्गीय, आ.दु.घ, अनाथ आणि दिव्यांग उमेदवारांसाठी ₹२९४ फी निश्चित करण्यात आली आहे.

निवड झालेल्या उमेदवारांना ₹५६,१०० ते ₹१,७७,५०० इतका आकर्षक वेतनमान देण्यात येणार असून नियुक्ती संपूर्ण महाराष्ट्रात केली जाणार आहे. इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या मुदतीपूर्वी ऑनलाईन अर्ज सादर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

------------------------------------------------------

अधिकृत वेबसाईट – येथे क्लिक करा

जाहिरात पाहण्यासाठीयेथे क्लिक करा

अर्ज करण्यासाठी  – येथे क्लिक करा

------------------------------------------------------

थोडे नवीन जरा जुने