MGID Header Code
Code End

Road safety: निगडी ते आकुर्डी मुख्य रस्त्याचे तात्काळ डांबरीकरण करा अन्यथा चक्का जाम आंदोलन करू : सचिन चिखले (MNS)

 


पिंपरी चिंचवड : निगडी सिग्नल ते चिंचवड स्टेशन या मुख्य मार्गावर महामेट्रो यांचे काम गेले सुमारे एक ते दीड वर्षांपासून सुरू आहे. या मार्गावरून दररोज हजारो प्रवासी प्रवास करतात तसेच लहान-मोठी वाहने मोठ्या प्रमाणावर ये-जा करत असतात.

सध्या निगडी सिग्नल ते आकुर्डी दरम्यान रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. मेट्रो कामामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले आहेत. अनेक ठिकाणी रस्त्याची चाळण झालेलेली आहे, या खड्ड्यांमुळे अनेक अपघात झाले असून अजूनही अपघात होत आहेत. दुचाकी स्वार घसरून पडत आहेत. नागरिकांच्या जीवितास गंभीर धोका निर्माण झाला आहे.

महामेट्रोकडे पुरेसा निधी उपलब्ध असतानाही रस्त्याच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरलेली आहे. तसेच श्रीकृष्ण मंदिर येथील रस्ता गेल्या एक वर्षांपासून खोदून ठेवण्यात आला असून तेथेही कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही.

वरील सर्व बाबींचा गांभीर्याने विचार करून निगडी ते आकुर्डी हा मुख्य रस्ता तात्काळ डांबरीकरण करून नागरिकांना दिलासा द्यावा.

अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने दिनांक २५ मार्च रोजी निगडी सिग्नल येथे चक्का जाम आंदोलन करण्यात येईल, याची कृपया नोंद घ्यावी. असा इशारा सचिन चिखले मनसे अध्यक्ष, पिंपरी-चिंचवड माजी. नगरसेवक व गटनेता, मनसे यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्तांना एका निवेदनाद्वारे दिला आहे.




थोडे नवीन जरा जुने