पदग्रहण व नियुक्ती पत्र प्रदान सोहळा उत्साहात
आळंदी (अर्जुन मेदनकर) : महाराष्ट्र राज्य भ्रष्टाचार निवारण समिती खेड तालुका अध्यक्षपदी शंकरराव वर्पे पाटील, उपाध्यक्ष कैलासराव घेनंद पाटील यांचे सह जिल्ह्यातील विविध पदाधिकारी यांना पद ग्रहण सोहळ्यात नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आली.
पदग्रहण व नियुक्ती पत्र प्रदान सोहळा माजी न्यायाधीश भूषण गवई यांच्या मार्गदर्शक सूचना प्रमाणे आळंदी येथील सुयश सभागृहात उत्साहात झाला. अन्याय विरोधात भ्रष्टाचार निवारण समिती महाराष्ट्र राज्य समिती कार्यरत आहे. या नियुक्त्या उपाध्यक्ष विकास डोळस, उपाध्यक्ष जनार्दन इंगळे, पुणे शहर कार्याध्यक्ष गिरीश घोगरे, पुणे जिल्हाध्यक्ष यांच्या पुढाकाराने अण्णाराजे शिवले पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली देण्यात आले. सुयश मंगल कार्यालयात पदग्रहण व नियुक्ती पत्र वाटप समारंभ उत्साहात झाला. या वेळी संस्थेच्या कार्यालयाचे उदघाटन देखील करण्यात आले. भ्रष्टाचार निवारण समिती नियुक्ती पत्र व पदभार वाटप पत्र विविध पदाधिकारी यांना देण्यात आली.
या प्रसंगी माजी सभापती रामदास ठाकूर पाटील, उपसरपंच दत्तात्रय वरपे, सुनील वर्पे, चेअरमन नारायण वर्पे, खेड पंचायत समिती माजी सदस्य तुकाराम वहिले, राजाराम लोखंडे, पांडाशेठ गावडे पाटील, रमेश गोडसे, भगवान लोखंडे, विलास काकडे, विजय ठाकूर पाटील यांचेसह पुणे शहरातील पदाधिकारी महिला उपस्थित होते.
या मध्ये खेड तालुका अध्यक्षपदी शंकरराव वर्पे पाटील, उपाध्यक्ष कैलासराव घेनंद पाटील, पुरंदर तालुका अध्यक्ष दादासाहेब खटाटे, दौंड तालुका अध्यक्ष रोहित भोसले, शिरूर तालुका अध्यक्ष हरिचंद्र खैरे, उपाध्यक्ष शिरूर तालुका शिवाजीराव खैरे पाटील, हवेली तालुका अध्यक्ष गणेश वागस्कर, उपाध्यक्ष प्रकाश कोतवाल, आळंदी शहर अध्यक्ष नरसिंगराव गायकवाड यांना देण्यात आले. या वेळी उपस्थित मान्यवरांनी मनोगते व्यक्त करीत मार्गदर्शन केले.
