पिंपरी चिंचवड - पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या ड क्षेत्रीय कार्यालयाकडून चुकीच्या पद्धतीने बेकायदेशीर कारवाई करण्यात येत होती आणि स्टॉल, हातगाडी काढून घ्या अन्यथा तीन दिवसात कारवाई करू असा दम देण्यात येत होता या कारवाईचा निषेध करत कायदा अंमलाचा जाब विचाराण्यासाठी या कार्यक्षेत्रातील विक्रेते तातडीने एकत्र येऊन आज ड क्षत्रिय कार्यालय रहाटणी काळेवाडी येथे आंदोलन केले.
नॅशनल हॉकर फेडरेशन, महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघ तर्फे झालेल्या आंदोलनामध्ये कामगार नेते काशिनाथ नखाते पथ विक्रेता समिती सदस्य राजू बिराजदार, सदस्य किरण साडेकर, शैलेंद्र गाडे, कार्याध्यक्ष लक्ष्मण शेरखाने, इरफान चौधरी, सागर कापूरे,मनोज रुपनवर, सुनील भोसले, संतोष बनगर,राजेश माने,नंदू आहेर, रवींद्र गायकवाड, सुषमा शेगावकर, स्वाती दिलापाक, ज्योती ढाकरे, अनाया सावंत, विशाल इचके सखाराम केदार,लाला राठोड,अशोक पगारिया, झरीना शेख,अंबालाल सुखावल आदीसह बहुसंख्याने विक्रेते सहभागी झाले.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडून फेरीवाला कायद्याची अंमलबजावणी न करता गरजू आणि गोरगरीब विक्रेत्यावरती कारवाई जाणीवपूर्वक करण्यात येत आहे. एकीकडे आठवडे बाजार अनियमित व चुकीचे असताना त्यांना संरक्षण द्यायचं आणि विक्रेत्यावर कारवाई करायची, कारवाई दरम्यान हिन वागणूक द्यायची. शिवराळ भाषा वापरायचे असेही प्रकार सुरू अनेक दिवसांपासून सुरू आहेत . महानगरपालिकेकडून प्रमाणपत्र देण्यास जाणीवपूर्वक टाळाटाळ केली जात आहे. अधिकारी ठराविक लोकांवर चुकीच्या पद्धतीने कारवाई करून त्यांचे नुकसान करीत आहेत. कायद्याची अंमलबजावणी न केल्यास पुढच्या कालावधीमध्ये बेमुदत उपोषण करण्यात येईल असा इशाराही यावेळी नखाते यांनी दिला .
आंदोलनानंतर क्षत्रिय प्रभारी अधिकारी पूजा दुधनाळे यांना भेटून निवेदन देऊन आंदोलकांनी सविस्तर चर्चा केली असता कायद्याचे अंमलबजावणीसाठी आयुक्त यांच्यासोबत महानगरपालिकेची बैठक होणे गरजेची आहे ती बैठक घेऊन लवकरच कार्यवाही सुरू भाकर झोनच्या जागाबाबत सकारात्मक विचार करू असे त्यांनी यावेळी सांगितले. फेरीवाला एकजुटीचा विजय असो..! लढेंगे.. जितेंगे.. बेकायदेशीर कारवाईचा निषेध असो.. अशा घोषणानी क्षेत्रीय कार्यालय दणाणून गेले.
