एक पाऊल पर्यावरण संवर्धनासाठी
पिंपरी चिंचवड परिसरातील पर्यावरण संवर्धनासाठी सामाजिक कल्याण एवं मानव संरक्षण संघाच्या वतीने एक अभिनव आणि स्तुत्य उपक्रम हाती घेण्यात आला आहे. संघाचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष श्री. किशोर थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संघाचे पुणे जिल्हा अध्यक्ष डॉ. अमित कोकणे व पुणे शहर जनरल सेक्रेटरी श्री रवींद्र आळणे यांच्या नेतृत्वाखाली “बीज संकलन व रोपण मोहीम २०२६” सुरू करण्यात येत असून, नागरिकांना या उपक्रमात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
या उपक्रमांतर्गत नागरिकांनी आपल्या परिसरात सहज उपलब्ध होणाऱ्या विविध झाडांच्या बिया जसे की आंबा, चिकू, लिंब, पिंपळ, बाभळी इत्यादी बिया संकलित करून जतन कराव्यात आणि त्या संघाकडे जमा कराव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे. जमा झालेल्या बियांचे रोपण येत्या जून महिन्यात पावसाळ्याच्या प्रारंभी डोंगराळ भागात करण्यात येणार आहे.
या उपक्रमामुळे वृक्षसंवर्धनास चालना मिळणार असून पर्यावरण संतुलन राखण्यास मदत होईल. तसेच पावसाचे प्रमाण वाढण्यास आणि वाढत्या तापमानावर नियंत्रण मिळविण्यासही हा उपक्रम उपयुक्त ठरणार आहे. भविष्यात हरित आणि समृद्ध पर्यावरण निर्माण करण्याच्या दिशेने हा एक महत्त्वाचा टप्पा ठरेल.
श्री. किशोर थोरात यांनी पिंपरी चिंचवड परिसरातील सर्व नागरिकांना या सामाजिक आणि पर्यावरणपूरक मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदवण्याचे आवाहन केले आहे. “एक बीज, हजारो झाडे – हरित भविष्याची वाटचाल” या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
संपर्क:
श्री. किशोर थोरात – 8796824682
श्री. अमित कोकणे – 9307712550
श्री. रवींद्र आळणे – 9922263332
अधिक माहितीसाठी व बिया जमा करण्यासाठी वरील क्रमांकांवर संपर्क साधावा. तसेच उपक्रमात सहभागी होण्यासाठी दिलेल्या WhatsApp ग्रुपमध्ये सहभागी व्हावे.
वरील उपक्रम हे सामाजिक कल्याण एवं मानव संरक्षण संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री राजेशजी कुंभारे व पश्चिम भारत अध्यक्ष श्री अमोल माने यांच्या प्रेरणेतून सुरू करण्यात आला आहे.
जनहितार्थ जारी,
सामाजिक कल्याण एवं मानव संरक्षण संघ
