TATA MOTORS : टाटा सफारी ईव्ही सणासुदीच्या हंगामात २०२६ मध्ये लॉन्च होणार


TATA MOTORS : भारतामधील आघाडीची वाहन निर्माता कंपनी Tata Motors लवकरच आपल्या फ्लॅगशिप इलेक्ट्रिक एसयूव्हीच्या रूपात Tata Safari EV सादर करण्याच्या तयारीत आहे. ही गाडी २०२६ च्या सणासुदीच्या हंगामात बाजारात येण्याची शक्यता असून, कंपनीची ही पहिली तीन-रांग (three-row) इलेक्ट्रिक एसयूव्ही असेल.

प्रमुख वैशिष्ट्ये:

Safari EV ही Tata Harrier EV च्या acti.ev+ प्लॅटफॉर्मवर आधारित असेल

ही पूर्णपणे नवीन EV नसून ICE (इंधन) मॉडेलचे इलेक्ट्रिक रूपांतर आहे

उत्पादन ऑगस्ट २०२६ पासून सुरू होण्याची शक्यता

बॅटरी आणि परफॉर्मन्स:

Safari EV मध्ये Harrier EV प्रमाणेच बॅटरी पर्याय दिले जातील:

65kWh आणि ७५kWh बॅटरी पॅक

स्टँडर्ड रियर-व्हील ड्राइव्ह (RWD) सेटअप

75kWh व्हेरिएंटमध्ये ड्युअल मोटर ऑल-व्हील ड्राइव्ह (AWD) पर्याय उपलब्ध होण्याची शक्यता

फीचर्स आणि डिझाइन:

बाह्य डिझाइनमध्ये किरकोळ बदल अपेक्षित

नवीन "TiDAL" आर्किटेक्चरमुळे अधिक आधुनिक फीचर्स आणि कनेक्टिव्हिटी

स्पर्धा:

Safari EV ची थेट स्पर्धा Mahindra XEV 9S सारख्या आगामी इलेक्ट्रिक एसयूव्हीशी होईल.

Safari EV लॉन्च झाल्यानंतर टाटा मोटर्सची इलेक्ट्रिक SUV लाईनअप पूर्ण होईल आणि भारतीय बाजारात मोठ्या आकाराच्या इलेक्ट्रिक SUV सेगमेंटमध्ये कंपनीची पकड आणखी मजबूत होईल.

थोडे नवीन जरा जुने