वसुनंदिनी फौंडेशन कडून किशोर थोरात यांना ‘डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम राष्ट्रीय प्रेरणा पुरस्कार 2026’ प्रदान

 


जामनेर (जळगाव) – सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे सामाजिक कार्यकर्ते किशोर आण्णासाहेब थोरात यांना जामनेर, जळगाव येथील वसुनंदिनी फौंडेशन यांच्या वतीने प्रतिष्ठेचा ‘डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम राष्ट्रीय प्रेरणा पुरस्कार 2026’ प्रदान करण्यात आला आहे.

हा सन्मान त्यांच्या दीर्घकालीन, सातत्यपूर्ण आणि समाजहिताच्या कार्याची दखल घेऊन प्रदान करण्यात आला आहे. किशोर थोरात हे सामाजिक कल्याण एवं मानव संरक्षण संघ चे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष असून विविध क्षेत्रात ते सक्रियपणे कार्यरत आहेत.

सामाजिक कार्याचा विस्तृत आवाका

किशोर थोरात हे गेल्या १५ वर्षांपासून समाजातील वंचित, गरजू, गरीब व निराधार नागरिकांसाठी सातत्याने कार्य करत आहेत.

त्यांच्या कार्यामध्ये –

गरजू नागरिकांसाठी अन्नदान उपक्रम

गरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत

रस्त्यावरच्या निराधार व्यक्तींना मदत

रक्तदान शिबिरे व आरोग्य जनजागृती

सामाजिक जनजागृती उपक्रम

युवकांना मार्गदर्शन

नैतिक व अध्यात्मिक मूल्यांची जोपासना

अशा विविध उपक्रमांचा समावेश असून, त्यांच्या कार्यामुळे अनेकांना आधार व दिशा मिळाली आहे.

पर्यावरणीय योगदान

पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीनेही त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली असून पिंपरी-चिंचवड येथे राबविण्यात आलेल्या धुळमुक्त शहर अभियानात त्यांनी सक्रिय सहभाग घेत प्रभात फेरी व रॅलीद्वारे नागरिकांमध्ये जनजागृती केली.

पुरस्कार व सन्मान

त्यांच्या या कार्याची दखल घेत आतापर्यंत ३० सामाजिक संस्थांनी त्यांना विविध पुरस्कारांनी सन्मानित केले आहे. त्यामध्ये प्रमुख –

छत्रपती महाराष्ट्र गौरव पुरस्कार २०२५ (सामाजिक कार्य)

छत्रपती महाराष्ट्र गौरव पुरस्कार २०२६ (अध्यात्मिक कार्य-संजीवनी फाउंडेशन संगमनेर)

समाजरत्न पुरस्कार

महाराष्ट्र आयकॉन पुरस्कार

कोहिनूर राष्ट्रीय पुरस्कार

महाराष्ट्र गौरव पुरस्कार

स्वामी विवेकानंद राष्ट्रीय प्रेरणा पुरस्कार,

अशा अनेक सन्मानांचा समावेश आहे.

डिसेंबर २०२५ मध्ये त्यांची सामाजिक कल्याण एवं मानव संरक्षण संघ या संस्थेच्या महाराष्ट्र राज्य अध्यक्षपदी निवड झाली असून, या माध्यमातून त्यांचे सामाजिक कार्य अधिक व्यापक पातळीवर विस्तारत आहे.

प्रेरणादायी नेतृत्व

“शून्यातून विश्व उभारणारे नेतृत्व” अशी ओळख निर्माण केलेले किशोर थोरात हे आज हजारो युवकांसाठी प्रेरणास्थान बनले आहेत. त्यांची कार्यपद्धती, सेवाभाव, सकारात्मक दृष्टिकोन आणि सामाजिक बांधिलकी समाजपरिवर्तनासाठी दिशादर्शक ठरत आहे.

कौतुकाचा वर्षाव

या गौरवाबद्दल सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक व विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत असून पुढील कार्यासाठी शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

हा ‘डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम राष्ट्रीय प्रेरणा पुरस्कार 2026’ त्यांच्या समाजसेवेच्या कार्याला मिळालेली मोठी दाद असून, भविष्यातही ते अधिक जोमाने समाजासाठी कार्य करतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

थोडे नवीन जरा जुने