एक झाड दत्तक योजना

 


“एक झाड भविष्यासाठी"

सामाजिक कल्याण एवं मानव संरक्षण संघ

महाराष्ट्र राज्य अध्यक्ष : किशोर आण्णासाहेब थोरात

जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने पिंपरी चिंचवड शहराचे महापौर राविभाऊ लांडगे यांच्या “हरित पिंपरी चिंचवड शहर” या संकल्पनेला प्रतिसाद देत सामाजिक कल्याण एवं मानव संरक्षण संघ तर्फे “एक झाड दत्तक योजना” हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.

आज संपूर्ण जग वाढत्या तापमान, प्रदूषण, पाण्याची कमतरता आणि पर्यावरणीय असंतुलनाचा सामना करत आहे. यावर्षी उन्हाळ्यात महाराष्ट्रासह अनेक भागात तापमानाने विक्रमी पातळी गाठली आहे. शहरांमध्ये काँक्रीटचे प्रमाण वाढत असल्यामुळे उष्णता अधिक जाणवत आहे. अशा परिस्थितीत पर्यावरण संतुलित ठेवण्यासाठी वृक्ष लागवड हाच सर्वात प्रभावी आणि शाश्वत उपाय आहे.

याच सामाजिक जाणिवेतून संस्थेच्या प्रत्येक सदस्याला व नागरिकांना एक झाड दत्तक स्वरूपात देण्यात येणार आहे. प्रत्येकाने हे झाड आपल्या घराजवळ, सोसायटी परिसरात, शाळा, मोकळी जागा किंवा गावात लावून त्याचे संगोपन करण्याची जबाबदारी स्वीकारायची आहे.

“एक झाड दत्तक” उपक्रमाचे उद्दिष्ट

पर्यावरण संरक्षणाची जनजागृती करणे

वाढते तापमान कमी करण्यासाठी हरित क्षेत्र वाढविणे

ऑक्सिजनचे प्रमाण वाढविणे

भविष्यातील पिढ्यांना निरोगी वातावरण देणे

प्रत्येक नागरिकामध्ये पर्यावरणाबद्दल जबाबदारी निर्माण करणे

 झाडांचे फायदे

✔ झाडे वातावरणातील कार्बन डायऑक्साइड शोषून ऑक्सिजन देतात

✔ तापमान कमी करण्यास मदत होते

✔ पावसाचे प्रमाण संतुलित राहण्यास मदत होते

✔ ध्वनी व वायू प्रदूषण कमी होते

✔ पक्षी व जीवसृष्टीस नैसर्गिक अधिवास मिळतो

✔ मानसिक स्वास्थ्य व सकारात्मक वातावरण निर्माण होते

या उपक्रमामध्ये सहभागी होणाऱ्या प्रत्येकाने झाड लावल्यानंतर त्या झाडासोबत सेल्फी काढून संस्थेच्या ग्रुपमध्ये पोस्ट करायचा आहे, जेणेकरून अधिकाधिक लोकांना प्रेरणा मिळेल.

“एक झाड दत्तक म्हणजेच एक सुरक्षित भविष्य दत्तक”

ही केवळ मोहीम नसून पर्यावरण वाचविण्याची सामूहिक जबाबदारी आहे.

सामाजिक कल्याण एवं मानव संरक्षण संघ तर्फे पिंपरी चिंचवड शहरात हा उपक्रम मोठ्या प्रमाणात राबविण्यात येणार असून सर्व नागरिकांनी, युवकांनी, महिला वर्गाने व विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन महाराष्ट्र राज्य अध्यक्ष किशोर आण्णासाहेब थोरात यांनी केले आहे.

सदर उपक्रम हा संस्थेचे खालील पदाधिकारी यांच्या सहभागातून राबविण्यात येणार आहे.

१. श्री.रवींद्र आळणे: पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष

2. श्री.अमित कोकणे:पुणे जिल्हा अध्यक्ष

3. श्री.भगवान वायकर: पुणे जिल्हा उपाध्यक्ष

4. श्री.विजय महाजन: पुणे जिल्हा सचिव

5. श्री.आशिष कदम: सदस्य

सदर उपक्रम हा सामाजिक कल्याण एवं मानव संरक्षण संघ चे राष्ट्रीय अध्यक्ष राजेश कुंभारे, पश्चिम भारत अध्यक्ष अमोल माने यांच्या मार्गदर्शनाखाली चालू केला आहे.

थोडे नवीन जरा जुने