!-- afp header code starts here --> केशवनगर प्रभाग क्रमांक १८ चिंचवड मध्ये पहिल्याच पावसात सगळीकडे पाणीच पाणी प्रशासनाचे हलगर्जीपणाचे पितळ उघडे!!

केशवनगर प्रभाग क्रमांक १८ चिंचवड मध्ये पहिल्याच पावसात सगळीकडे पाणीच पाणी प्रशासनाचे हलगर्जीपणाचे पितळ उघडे!!


पिंपरी चिंचवड: आज तुफानी पावसाने शहरात जनजीवन विस्कळीत झाले. प्रशासनास प्रत्येक वर्षीची कल्पना आहे की कोणत्या ठिकाणी जास्त पाणी साचते तरीही अजूनही कुठेही काळजी घेतलेली दिसली नाही अधिकारी फक्त मोजक्याच लोकांचे म्हणजे तोंड बघून कामे करतात त्यामुळे नागरिकांच्या सुविधांची कामे मागे राहतात.

 केशवनगर चिंचवड प्रभागात राज पार्क ची मागची साईट, शनी मंदिर,श्री शिवाजी उदय मंडळ अशा अनेक ठिकाणी पाणी तुंबलेले नागरिकांना पाहायला मिळालं व त्याचा त्रासही सहन करावा लागला 


अपेक्षा आहे पुढील काही दिवसात याचा सर्वे करून त्यावर उपाययोजना केली जाईल अन्यथा प्रत्येक वर्षी प्रमाणे पावसाळ्यात नागरिकांना त्रास सहन करावा लागणार हे नक्की 

मधुकर बच्चे

महामंत्री:भारतीय जनता पार्टी पिंपरी चिंचवड शहर

थोडे नवीन जरा जुने