धानोरे येथील मेडिकल वेस्ट गोडाऊनला आग ; प्रचंड वित्त हानी

 

आळंदी  : येथील  पोलीस स्टेशन हद्दीतील धानोरे गावातील गट नंबर 392 जागा मालक हनुमंत कुटे यांचे जागेतील संतोष  उपाध्याय यांच्या मालकीचे असलेल्या गायत्री स्टील, मेटल या स्क्रॅप वर्गीकरण करून  विल्हेवाट लावणाऱ्या उद्योगास मोठ्या प्रमाणात आग लागल्याने मोठी वित्त हानी झाली. यात जीवित हानी मात्र टळली. या गोडाऊन मधून कचरा पुढे विल्हेवाट लावली जाते.  गोडाऊन मध्ये प्लास्टिक सह आदी ज्वलनशील कचरा साठलेला होता. 

दुपारी साडे चार चे सुमारास मोठी आग लागली. या वेळी तत्काळ परिसरातील अग्निशमन विभागाचे सहा टँकरचे सहाय्याने आग आयोजन आणण्याचे काम करण्यात आले. परिसरात आग पसरल्याने धुराचे काळे लोट परिसरातील शेतकरी यांचे शेतातील पिकेही काळी झाली. परिसरात ग्रामस्थ आणि बघ्यांची मोठी गर्दी केली होती. गर्दी पांघवण्यास पोलिसांनी परिश्रम घेतले. यावेळी बघे संतप्त झाले होते. या वेळी आळंदी पोलिस स्टेशनचे वरिष्ठ  पोलिस निरीक्षक भीमा नरके आणि सहकारी यांनी सुरक्षिततेच्या व वाहतुकीच्या अनुषंगाने मोठा बंदोबस्त देत कामकाज पाहिले.आता आग आटोक्यात आली आहे.

थोडे नवीन जरा जुने