!-- afp header code starts here --> मुंबईत पावसाच्या पहिल्या सरी आणि हा पहा व्हिडीओ

मुंबईत पावसाच्या पहिल्या सरी आणि हा पहा व्हिडीओ

 मुंबईत पावसाच्या पहिल्या सरी कोसळताच, आरे जंगल पुन्हा एकदा निसर्गाच्या एका अद्भुत चमत्काराचे साक्षीदार बनले आहे — ते म्हणजे भारतीय मोठ्या बेडकांचा (Indian bullfrog) वार्षिक वीण हंगाम (mating ritual).

या विणीच्या हंगामात (Breeding season), मादी बेडकाला आकर्षित करण्यासाठी नर बेडूक आपल्या नेहमीच्या ऑलिव्ह-ग्रीन (हिरवट-करड्या) रंगावरून बदलून डकडकणारा पिवळा धमक रंग धारण करतात. मुसळधार पावसानंतर आरे मिल्क कॉलनीमध्ये दरवर्षी पावसाळ्यात दिसणारा हा मनमोहक निसर्ग चमत्कार पाहण्यासाठी आणि त्याचे दस्तऐवजीकरण करण्यासाठी वन्यजीवप्रेमींनी मोठी गर्दी केली होती.

थोडे नवीन जरा जुने