!-- afp header code starts here --> राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना जयंती निमित्त आम आदमी पार्टीच्या वतीने अभिवादन

राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना जयंती निमित्त आम आदमी पार्टीच्या वतीने अभिवादन


पिंपरी-चिंचवड
:  राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंती निमित्त आम आदमी पार्टी, पिंपरी-चिंचवड शहर समितीच्या वतीने केएसबी चौक येथील शाहू महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.

यावेळी आप शहराध्यक्ष वैजनाथ  शिरसाट यांनी शाहू महाराजांच्या सामाजिक कार्याचा गौरव केला. "शाहू महाराजांनी शिक्षण, आरक्षण आणि सामाजिक समतेचा पाया रचला. त्यांचा वारसा पुढे नेणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल," असे शिरसाट म्हणाले.

या अभिवादन कार्यक्रमास आम आदमी पार्टी उपाध्यक्ष चंद्रमणी जावळे, आप नेते सुरेश गायकवाड, महासचिव स्वप्निल जेवळे, मुख्य प्रवक्ते प्रकाश हगवणे, संघटन मंत्री निकेत शिंदे, कामगार आघाडी कार्याध्यक्ष लक्ष्मण माने यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

उपस्थित सर्वांनी शाहू महाराजांच्या विचारांवर चालण्याचा निर्धार व्यक्त केला.

संपर्क:

आम आदमी पार्टी, पिंपरी-चिंचवड शहर समिती  

शहराध्यक्ष - वैजनाथ शिरसाट  

मो.8788732858

थोडे नवीन जरा जुने