!-- afp header code starts here --> बाबुरावजी घोलप महाविद्यालयात प्रथम वर्ष वाणिज्य विद्यार्थ्यांसाठी उद्बोधन वर्ग संपन्न

बाबुरावजी घोलप महाविद्यालयात प्रथम वर्ष वाणिज्य विद्यार्थ्यांसाठी उद्बोधन वर्ग संपन्न

सांगवी, पुणे : पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे बाबुरावजी घोलप महाविद्यालय, सांगवी येथील वाणिज्य विभागातर्फे शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मधील प्रथम वर्ष वाणिज्य प्रवेशित विद्यार्थ्यांसाठी दि. १५ जुलै २०२६ रोजी सकाळी १०.० वाजता _उद्बोधन वर्ग_ चे आयोजन महाविद्यालयाच्या सभागृहात करण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक वाणिज्य विभाग प्रमुख व उपप्राचार्या प्रा. डॉ. वंदना पिंपळे यांनी केले. त्यांनी विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन शिस्त व शैक्षणिक संधींबाबत मार्गदर्शन केले. 

यावेळी विविध समिती प्रमुखांनी माहिती दिली. प्रा. डॉ. चंदा हासे यांनी प्रवेश प्रक्रिया व Open Elective विषयांबाबत, डॉ. अमृता इनामदायांनी सांस्कृतिक उपक्रम, लैंगिक अत्याचार प्रतिबंध तक्रार समिती व शिष्यवृत्तींबाबत, डॉ. जितेंद्र वडशिंगकर यांनी कला विभागातील Open Elective बद्दल, डॉ. विजय घाडगे यांनी विद्यार्थी विकास मंडळाचे उपक्रम, डॉ. नागेश भंडारी यांनी एन.एस.एस. व प्लेसमेंट संधी, कॅप्टन डॉ. विठ्ठल नायकवडी यांनी ग्रंथालय व एन.सी.सी., डॉ. विद्या पाठारे यांनी क्रीडा व अँन्टीरॅगिंग समिती, डॉ.राणी भगत यांनी संशोधन व नावीन्य, तर डॉ. सुभाष वाव्हळ यांनी परीक्षा पद्धती व NEP २०२० नुसार F.Y.B.Com अभ्यासक्रमाबाबत मार्गदर्शन केले.


कार्यक्रमाच्या अध्यक्षा प्रा. डॉ. संगीता जगताप, प्राचार्या व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व्यवस्थापन परिषद सदस्या यांनी विद्यार्थ्यांना सर्वांगीण विकासासाठी सहभागी होण्याचे आवाहन केले. 


सूत्रसंचालन समन्वयक डॉ. अमृता इनामदार यांनी केले तर आभार डॉ. मनिषा त्र्यंबके यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशासाठी प्रा. सुषमा सोनार, प्रा. अरबाज सय्यद, प्रा. प्रवीण खाडे, प्रा. संतोष सास्तुरकर व श्री. प्रणित पावले यांनी परिश्रम घेतले. सदर कार्यक्रमासाठी प्रथम वर्ष वाणिज्य वर्गातील ११६ विद्यार्थी उपस्थित होते

थोडे नवीन जरा जुने