!-- afp header code starts here --> गणेश अवघडे यांचे निवडीबद्दल कष्टकरी संघर्ष महासंघाकडून अभिनंदन!

गणेश अवघडे यांचे निवडीबद्दल कष्टकरी संघर्ष महासंघाकडून अभिनंदन!

 


पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने साजरा करण्यात येणाऱ्या लोकशाहीर आण्णाभाऊ साठे जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी गणेश अवघडे यांची निवड झाल्याबद्दल कष्टकरी संघर्ष महासंघ, महाराष्ट्र राज्याच्या वतीने महासंघाचे मध्यवर्ती कार्यालय चिंचवड येथे   त्यांचा सत्कार करून हार्दिक अभिनंदन करण्यात आले.

यावेळी कष्टकरी संघर्ष महासंघ, महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष तथा कामगार नेते काशिनाथ नखाते यांनी गणेश अवघडे यांना शुभेच्छा देताना सांगितले की, लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांनी आपल्या साहित्य, शाहिरी आणि सामाजिक कार्यातून कष्टकरी, कामगार, वंचित आणि शोषित समाजाला संघर्षाची प्रेरणा दिली. त्यांच्या विचारांचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी जयंती उत्सव हा केवळ औपचारिक कार्यक्रम न राहता समाजप्रबोधनाचे प्रभावी माध्यम बनणे आवश्यक आहे.

नखाते पुढे म्हणाले की, यंदाचे "जयंती प्रबोधन पर्व" हे कामगार, कष्टकरी आणि सर्वसामान्यांच्या हक्क, सामाजिक समता, शिक्षण, संविधानिक मूल्ये आणि सामाजिक न्यायाचा संदेश देणारे ठरावे. लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या विचारांमधून सामाजिक परिवर्तनाची प्रेरणा घेऊन समाजातील दुर्बल घटकांच्या प्रश्नांवर जनजागृती होणे ही काळाची गरज आहे.

कष्टकरी संघर्ष महासंघाच्या वतीने गणेश अवघडे यांनी सत्कार बद्दल आभार व्यक्त करत म्हणाले की  महोत्सव  समिती सदस्य,  मतदार, सामाजिक कार्यकर्ते आणि मित्रमंडळीच्या शुभेच्छा च्या पाठबळावर मला संधी प्राप्त झाली आहे. या वर्षीचा  जयंती उत्सव लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या विचारांना न्याय देणारा, समाजातील सर्व घटकांना एकत्र आणणारा आणि विशेषतः कामगार  हिताचे प्रश्न प्रभावीपणे मांडणारा ठरणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

यावेळी माजी अध्यक्ष नाना कसबे, सामाजिक कार्यकर्ते सचिन नागणे,  महासंघाचे सचिव चंद्रकांत कुंभार, अविनाश बनसोडे, शामसुद्दीन शेख, अमोल गायकवाड, ओमप्रकाश मोरया आदी उपस्थित होते.

थोडे नवीन जरा जुने