टू-व्हीलर टॅक्सीच्या विरोधात तीव्र जनआंदोलन करणार :- डॉ बाबा कांबळे,
पिंपरी चिंचवड – “टू-व्हीलर टॅक्सी ही संकल्पनाच मुळात प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत घातक आहे. खासगी कंपन्यांच्या फायद्यासाठी प्रवाशांच्या जीवाशी खेळणे, आणि रिक्षा टॅक्सी व्यवसाय संपवण्याचा प्रयत्न,आम्ही कदापि खपवून घेणार नाही,” या विरोधामध्ये, लवकरात लवकर जाहीर सभा बोलून तीव्र आंदोलन सुरू केले जाणार आहे, या आंदोलनात सर्व रिक्षा चालक टॅक्सी चालकांनी सहभागी व्हावे, परिवहन विभागाने आम्हाला आंदोलन करण्यास भाग पाडू नये असा सणसणीत इशारा महाराष्ट्र रिक्षा पंचायतीचे संस्थापक अध्यक्ष गोरगरीब कष्टकऱ्यांचे नेते डॉ. बाबा कांबळे यांनी दिला.
पिंपरी-चिंचवड शहर अध्यक्षपदी विजय ढगारे यांची नुकतीच बहुमताने निवड करण्यात आली. यानंतर विजय ढगारे यांच्या नेतृत्वाखाली पिंपरी चिंचवड शहरातील इतर पदाधिकारी यांची नियुक्ती आज करण्यात आली,या नियुक्ती सोहळ्याप्रसंगी आयोजित बैठकीत डॉ. बाबा कांबळे बोलत होते. "तब्बल २० वर्षांनंतर पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष पद बदलण्यात आले, वीस वर्षानंतर विजय ढगारे, यांची पिंपरी चिंचवड शहर अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली, संयमी शांत व कार्यात मग्न असे विजय ढगारे यांचे नेतृत्व पुढे येत आहे,संघटनेत झालेला हा नेतृत्वाचा बदल रिक्षा चालक-मालकांच्या संघर्षाला अधिक बळ देणारा ठरेल, असा विश्वास डॉ बाबा कांबळे यांनी व्यक्त केला. संघटनेमधील केलेला बदल, "भाकरी फिरवली, अशी चर्चा देखील पिंपरी चिंचवड शहरातील रिक्षा टॅक्सी चालकांमध्ये सुरू आहे, यामुळे योग्यवेळी भाकरी फिरवली पाहिजे, योग्यवेळी भाकरी न फिरवल्यास ती करम की असे म्हणतात यामुळे आता भाकरी फिरवली आहे, महाराष्ट्र रिक्षा पंचायत मध्ये नवी आणि जुने, मिळून शहराची नवीन कार्यकारणी तयार झाली आहे, सर्वांनी एकत्र मिळून रिक्षा टॅक्सी चालकांच्या प्रश्न सोडवण्यासाठी काम करा, डॉ.बाबा कांबळे म्हणाले,
"टू-व्हीलर टॅक्सीच्या विरोधात कायदेशीर व रस्त्यावरची लढाई
डॉ. बाबा कांबळे म्हणाले, “यापूर्वीही पुणे-पिंपरी-चिंचवडमधील रिक्षा चालक-मालकांनी प्रबळ कायदेशीर लढा देऊन बेकायदेशीर टू-व्हीलर टॅक्सी बंद करण्यास भाग पाडले होते. उच्च आणि सर्वोच्च न्यायालयानेही रिक्षा चालकांच्या बाजूने महत्त्वपूर्ण आदेश दिले आहेत. आता जर राज्य परिवहन विभागाने पुन्हा एकदा चुकीचे धोरण राबवून त्यांना मुभा देण्याचा प्रयत्न केला, तर पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये तीव्र जनआंदोलन छेडले जाईल.” असा इशारा यावेळी, डॉ बाबा कांबळे, यांनी दिला.
या बैठकीमध्ये विविध ठराव मंजूर करण्यात आले ,बैठकीत मंजूर करण्यात आलेले ठराव पुढीलप्रमाणे :
"टू-व्हीलर टॅक्सीच्या बेकायदेशीर परवान्यांविरोधात उच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करणे आणि रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करणे.
शिस्त व सेवा: प्रवाशांना दर्जेदार सेवा देण्यासाठी ‘शिस्त आणि सेवा’ मोहीम राबवणे.
: शहरात सर्व रिक्षांमध्ये मीटरचा वापर अनिवार्य करून भाडेदर नियमांचे काटेकोर पालन करणे.
मेट्रो स्टेशन व्यवस्थापन: पुणे पिंपरी-चिंचवडमधील मेट्रो स्थानकांवर रिक्षांसाठी अधिकृत पार्किंग व शिस्तबद्ध थांबे उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाकडे पाठपुरावा करणे.
: प्रवाशांशी उद्धट वर्तन करणाऱ्या किंवा अडवणूक करणाऱ्या चालकांवर संघटनात्मक स्तरावर कडक कारवाई करणे.
प्रमुख उपस्थिती:
या बैठकीत महाराष्ट्र राज्य युवक अध्यक्ष शुभम तांदळे, रिक्षा ब्रिगेडचे राज्य प्रमुख अनिल शिरसाट, नवनियुक्त शहर अध्यक्ष विजय ढगारे, राज्य प्रवक्ते धनंजय कुदळे, कार्याध्यक्ष दीपक ताटे, युवक अध्यक्ष विशाल ससाणे, राज्य उपप्रमुख सुनील कदम, विद्यार्थी वाहतूक विभागाचे अध्यक्ष प्रदीप आयर, शहर संघटक दत्ता गिल्ले, खेड तालुका अध्यक्ष सुनील जाधव यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
महाराष्ट्र रिक्षा पंचायत - नवीन पदाधिकारी नियुक्ती
सुनील कदम, महाराष्ट्र उपप्रमुख, रिक्षा ब्रिगेड,महिला शहर/विभाग: फातिमा शेख, रिक्षा ब्रिगेड महिला आघाडी,(शहराध्यक्ष), अर्चना खगडे-कांबळे, सायरा बानू शेख (उपाध्यक्ष).विद्यार्थी सेना:अजय साळवे (उपाध्यक्ष), मधुकर शेलार (अध्यक्ष), सैपून बागवान (उपाध्यक्ष), अमीर शेख (कार्याध्यक्ष).निगडी विभाग:अविनाश साळवे (अध्यक्ष), अँथनी पंडित (उपाध्यक्ष), विशाल शिंदे (संघटक).सदस्य: आयुब पटेल, समीर शेख, जयपाल शिंगे, निसार मनीयार, जावेद तांबोळे, रिजवान शेख, उवेस शेख.
अधिक माहितीसाठी संपर्क:
महाराष्ट्र रिक्षा पंचायत आणि रिक्षा ब्रिगेड, पिंपरी-चिंचवड. मो 9850732424,7276232424,
