पिंपरी चिंचवड : प्राध्यापक दीपक जाधव व प्राध्यापिका वैशाली गायकवाड यांनी सोसायटीमधील सर्वांना एकत्रित करून बेघर बेसारा अशा निराधार लोकांसाठी फराळाचे व फळांचे वाटप करण्यास तयार केले.
आज Pristine फॉस्फेरा या सोसायटी तील सभासदा मार्फत पिंपरी येथील सावली निवारा केंद्रात असणाऱ्या माय बापास आषाढी एकादशी निमित्त फराळाचे आणि फळांची वाटप केले.
यावेळी वुई टूगेदरचे सलीम सय्यद सर, जयंत कुलकर्णी, रवींद्र काळे, शंकरराव कुलकर्णी, दिलीप चक्रे तसेच त्यांचे इतर सहकारी उपस्थित होते.
प्रकाश वाघमारे ,विलास बावळ मेघराज हजारे, राहुल इंगळे, जयस्वाल, योगेश खिळे , सोनाली चौधरी, प्रणिता पवार, यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले.
