पिंपरी-चिंचवड शहरात ‘विभाजन विभिषिका दिन’ निमित्त भाजपच्या वतीने मूक मोर्चाचे आयोजन; सिंधी बांधवांचा मोठा सहभाग

​पिंपरी-चिंचवड :भारतीय जनता पक्ष महाराष्ट्र प्रदेशच्या आदेशानुसार दरवर्षीप्रमाणे या वर्षीही १४ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजता ‘विभाजन विभिका दिन’ म्हणजे ‘अखंड भारताची फाळणी-विभाजन दिवस’ हा भारतीय इतिहासातील काळा दिवस म्हणून पाळण्यात आला. या निमित्ताने पिंपरी-चिंचवड शहर भारतीय जनता पक्षाच्या वतीने पिंपरीत एका भव्य मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या मूक मोर्चात सिंधी समाज बांधव आणि हिंदू समाज बांधव मोठ्या प्रमाणावर सहभागी झाले होते.

​पिंपरी येथील डिलक्स चौक येथून या मोर्चाची सुरुवात झाली. हा मूक मोर्चा शगुन चौक आणि साई चौक मार्फत पुढे जात बी. टी. अडवाणी धर्मशाळा येथे येऊन संपन्न झाला, जिथे या मोर्चाचा समारोप करण्यात आला. फाळणीच्या वेळी विस्थापित झालेल्या आणि त्रास सहन केलेल्या देशबांधवांच्या स्मृतीस याद्वारे उजाळा देण्यात आला.

​या मूक मोर्चात भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष शत्रुघ्नबापू काटे, आमदार महेशदादा लांडगे, आमदार अमित गोरखे, माजी आमदार अश्विनीताई जगताप, हर घर तिरंगा अभियानाचे प्रदेश सहसंयोजक अनुप मोरे, हर घर तिरंगा अभियानाचे पिंपरी-चिंचवड जिल्हा संयोजक मोरेश्वर शेडगे, प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे, सरचिटणीस मधुकर बच्चे, विकास डोळस, वैशाली खाडये, महिला मोर्चाच्या अध्यक्षा सुजाता पलांडे, युवा मोर्चा अध्यक्ष दिनेश यादव, गटनेते प्रशांत शितोळे, माजी महापौर नितीन काळजे, राहुल जाधव, स्थायी समितीच्या माजी सभापती उषाताई वाघेरे, माजी उपमहापौर प्रभाकर वाघेरे, नगरसेवक बाबा त्रिभुवन, सचिन तापकीर, प्रवक्ते राजु दुर्गे अजित कुलथे, मंडलाध्यक्ष मोहन राऊत, मंगेश धाडगे, शिवराज लांडगे, धरम वाघमारे, मनिष पंजाबी, कुणाल साठे, ऋषिकेश वाघेरे, गणेश ढाकणे, कैलास सानप, नं

थोडे नवीन जरा जुने