पिंपरी चिंचवड : संततुकाराम नगर येथे महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या वतीने सुदाम शिंदे,अण्णा जोगदंड,शिवाजीराव शिर्के यांच्या प्रमुख उपस्थितीत ध्वजारोहण करण्यात आले .
ध्वजारोहण प्रसंगी सुदाम शिंदे म्हणाले की कोणता इतिहास सांगायचा नसतो तो घडवायचा असतो तिरंगा ध्वजाचा मान राखून, स्वतंत्र सैनिक, वीर हुतात्मे यांच्या भावनेचा व कार्याचा आदरपूर्वक सन्मान केला पाहिजे.
अण्णा जोगदंड म्हणाले की गुणवंत कामगारांनी पुरस्कार मिळाल्यानंतरही सामाजिक काम चालू ठेवण्याचे आवाहन केले, तरुणाई मोबाईल, टिव्हीच्या विळख्यात अडकली आहे त्यामध्ये वाचन संस्कृती रूजवण्याचे काम करावे गुणवंत कामगारांने करावे असा सल्लाही जोगदंड यांनी दिला.
ज्येष्ठ साहित्यिक शिवाजीराव शिर्के म्हणाले की मी खूप भाग्यवान आहे की देशाचा पहिला स्वतंत्र दिन साजरा करण्याचे भाग्य मला मिळाले आणि माझ्या उघड्या डोळ्यांनी पहिला स्वतंत्र दिन बघितला. गुणवंत कामगारांनी मिळेल त्या वेळेत लिखाण वाढवले पाहिजे माझ्या येसूबाई या पुस्तकाची नोंद इंडिया बुक मध्ये झाली आहे याचा मला सार्थ अभिमान आहे.
अण्णा जोगदंड यांनी"कावळा म्हणतो' काव काव एक तरी झाड लाव" असे म्हणत की प्रत्येकाने आपल्या वाढदिवसाला एक तरी झाड लावावे व जगवावे अशी शपथ दिली.
गुणवंत कामगार काळुराम लांडगे यांचा सन्मान त्यांना विशेष कार्यकारी अधिकारी पद मिळाल्यामुळे करण्यात आला
जेष्ट साहित्यिक शामराव सरकाळे आणि प्रकाश घोरपडे यांनी देशभक्तीपर गिते सादर केली.
मंडळाच्या वतीने शिवण क्लासेसची परीक्षा घेण्यात आली होती उत्तीर्ण विद्यार्थ्यांना व महिलांना प्रमाणपत्रही देण्यात आली.
पसायदानाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आलीयावेळी केंद्र संचालक अनिल कारळें केंद्र उपसंचालिका सुरेखा मोरे, कार्यक्रमाचे अध्यक्ष सुदाम शिंदे प्रमुख पाहुणे शिवाजीराव शिर्के,अण्णा जोगदंड, महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचे उपअधीक्षक प्रवीण सावंत,प्रकाश घोरपडे, ज्येष्ठ साहित्यिक शामराव सरकाळे , सामाजिक कार्यकर्ते किरण कोळेकर ,गुणवंत कामगार संगीता जोगदंड,काळुराम लांडगे ,ह भ प शामराव गायकवाड, सुदाम शिंदे, लक्ष्मण शिंदे, किरण हेळकर,शैलेजा आवडे,संगिता क्षीरसागर,सह अनेक कामगार उपस्थित होते.
केंद्र संचालक आनिल कारळे यांनी सुत्रसंचालन केले तर उपसंचालिका सुरेखा मोरे यांनी आभार मानले.
