निर्धारित शुल्क हे 12 तासांचे ; दुचाकी वाहनास 20 रुपये ; जड वाहनास 200 रुपये
आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : येथील चाकण चौक, झाडी बाजार येथील आळंदी नगरपरिषदेच्या वाहनतळावर निर्धारित दरा पेक्षा अधिक पार्किंग शुल्क आकारल्या प्रकरणी वाहनतळ ठेकेदार निशिकांत चव्हाण यांना आळंदी नगरपरिषदे मार्फत 5 हजार दंड आकारणीची कारवाई करण्यात आली आहे. अशी माहिती मुख्याधिकारी माधव खांडेकर यांनी सांगितले.
आळंदी नगरपरिषदेने वाहनांच्या प्रकारा नुसार 12 तासांसाठी निश्चित केलेल्या दरांपेक्षा अधिक पार्किंग शुल्क आकारण्यात येत असल्या बाबत नागरिकांच्या तक्रारी आल्याने आळंदी नगरपरिषदेने या प्रकरणाची दखल घेत ठेकेदारावर कारवाई केली आहे.
वाहनतळ ठेकेदार निशिकांत चव्हाण यांना पाच हजार रुपये दंड आकारण्यात आला आहे. या दंडाची रक्कम चलनाद्वारे नगरपरिषदे कडे जमा करून घेण्यात आली असल्याचे खांडेकर यांनी सांगितले.
वाहन तळावर यापुढे नगरपरिषदेने निर्धारित केलेल्या दरा नुसारच पार्किंग शुल्क वसूल करण्याच्या स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत. पुन्हा निर्धारित दरापेक्षा अधिक शुल्क वसूल केल्याचे निदर्शनास आल्यास ठेका रद्द करून अनामत रक्कम जप्त करण्याची कार्यवाही करण्यात येईल, अशी नोटीसही संबंधित ठेकेदारास देण्यात आली आहे.
नगरपरिषदे कडून नागरिकां कडून निर्धारित दरापेक्षा अधिक पार्किंग शुल्क आकारले जाऊ नये. या साठी नियमित तपासणी करण्यात येणार आहे. नागरिकांनी अधिक शुल्क आकारल्याचे निदर्शनास आल्यास त्याची माहिती नगरपरिषद प्रशासनाकडे द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. निर्धारित शुल्क हे 12 तासांचे असून जास्त दर देऊ नयेत असे आवाहन केले आहे.
असे आहे वाहन तळ निर्धारित शुल्क : - प्रति वाहन प्रकार नुसार पुढील प्रमाणे आहे. यात दुचाकी वाहनासाठी 20 रुपये, तीन चाकी वाहनास 50 रुपये, चार चाकी हलकी वाहना साठी 50 रुपये, चार चाकी आसन क्षमता ( १० ते २० सीट ) वाहनास 100 रुपये, सहा चाकी वाहन मिनी डोअर, डंपर 150 रुपये, बस, ट्रक इत्यादी जड वाहने 200 रुपये 12 तासां साठीचे वाहनतळ शुल्क असल्याचे मुख्याधिकारी माधव खांडेकर यांनी सांगितले.
