आळंदीत संत सावता माळी महाराज संजीवन समाधी सोहळा साजरा

 

आळंदी : येथील श्री संत सावता माळी सेवा मंडळाच्या वतीने सालाबाद प्रमाणे आळंदी देवाची येथे सावता माळी महाराज यांचा ७३१ वा. समाधी सोहळा हरिनाम गजरात विविध उपक्रमांनी धार्मिक मंगलमय उत्साही वातावरणात साजरा झाला. या निमित्त हभप शुभम महाराज पोकळे यांचे सावता महाराज यांच्या जीवनावर आधारित कीर्तन सेवा श्री ज्ञानेश्वर महाराज मंदिरात सुश्राव्य वाणीतून किर्तन सेवा  झाले.

 महाप्रसादाचे आयोजन राधाकृष्ण मंगल कार्यालयात करण्यात आले. येथे श्रींची प्रतिमा पूजन उत्साहात करण्यात आले. यावेळी सर्व पदाधिकारी, समाज बांधव व भगिनींच्या उपस्थित धार्मिक  कार्यक्रम भक्तीमय उत्साही वातावरणात पार पडला. या प्रसंगी महेश गोरे, महेश जाधव, राजेंद्र गोरे, माऊली जाधव, माऊली कोद्रे, मारुती जाधव, किरणशेठ नरके, भरत गोरे, समीर गोरे यांचेसह महिला पदाधिकारी हो मोठ्या संख्येने उपस्थिती होते.यावेळी माऊलींचे चोपदार राजाभाऊ रंधवे, आळंदी जनहित फाउंडेशन कार्याध्यक्ष अर्जुन मेदनकर, हमीद शेख आदी मान्यवरांचे सत्कार करण्यात आले. महाप्रसाद वाटपाने सोहळ्याची सांगता हरिनाम गजरात झाली.

थोडे नवीन जरा जुने