कर्तव्यदक्ष पोलिसांचा सन्मान करून सामाजिक कल्याण एवं मानव संरक्षण संघाने दिला कृतज्ञतेचा संदेश

 


पोलिसांच्या कार्याला सलाम; सन्मानातून कर्तव्यनिष्ठेची प्रेरणा निर्माण करण्याचा संस्थेचा प्रयत्न

पिंपरी चिंचवड  : स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने देशाच्या सुरक्षिततेसाठी, कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी तसेच नागरिकांच्या संरक्षणासाठी अहोरात्र कर्तव्य बजावणाऱ्या पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सामाजिक कल्याण एवं मानव संरक्षण संघाच्या वतीने कर्तव्यदक्ष पोलिसांचा सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.

हा सन्मान संस्थेचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष डॉ. किशोर थोरात आणि उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष श्री. रविराज बी. आळणे यांच्या हस्ते करण्यात आला.

एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांचा गौरव

एमआयडीसी भोसरी पोलीस स्टेशनमधील पोलीस उपनिरीक्षक श्री. बालाजी जोन्नापल्ले यांचा सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.

यावेळी परिमंडळ ३ सहाय्यक पोलीस आयुक्त श्री. सुधाकर यादव तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. गणेश जामदार यांची उपस्थिती होती.

यावेळी बोलताना श्री. रविराज बी. आळणे यांनी श्री. बालाजी जोन्नापल्ले यांच्या कार्याचे विशेष कौतुक केले. ते म्हणाले, “बालाजी जोन्नापल्ले यांच्यासारखे कर्तव्यदक्ष, तत्पर आणि प्रामाणिक अधिकारी समाजाला मिळणे ही अभिमानाची बाब आहे. त्यांच्या तत्पर कार्यपद्धतीमुळे सेक्टर ६ आणि ९ मोशी प्राधिकरण परिसरातील घरफोडीच्या घटनांना आळा बसण्यास मदत झाली असून गुन्हेगारीला चाप बसला आहे. अशाच प्रकारचे कर्तव्यनिष्ठ अधिकारी मोठ्या संख्येने तयार झाले पाहिजेत. त्यांच्या कार्यातून इतर पोलिस अधिकारी व समाजातील तरुणांनी प्रेरणा घ्यावी.”

पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत डॉ. किशोर थोरात आणि श्री. रविराज बी. आळणे यांच्या वतीने श्री. सुधाकर यादव आणि श्री. गणेश जामदार यांना झाडांचे रोप भेट देण्यात आले. पोलिसांच्या सन्मानासोबतच पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्याचा संस्थेचा हा उपक्रम विशेष ठरला.

वाकड पोलीस ठाण्यातील महिला पोलिसांचा गौरव

वाकड पोलीस स्टेशनमधील कर्तव्यदक्ष महिला पोलीस हवालदार श्रीमती नीता जाधव आणि श्रीमती बालिका देवकर यांचाही सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.

यावेळी वाकड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. विठ्ठल साळुंखे यांना संस्थेच्या वतीने झाडाचे रोप भेट देण्यात आले. समाजाच्या सुरक्षिततेसाठी कार्य करणाऱ्या पोलिसांचा सन्मान आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश यांची सांगड घालण्याचा संस्थेचा हा प्रयत्न कौतुकास्पद ठरला.

सामाजिक कल्याण एवं मानव संरक्षण संघाचे सामाजिक कार्य

सामाजिक कल्याण एवं मानव संरक्षण संघ ही संस्था समाजातील गरजू, वंचित आणि दुर्बल घटकांसाठी कार्य करण्यासोबतच मानवाधिकारांचे संरक्षण, सामाजिक न्याय, जनजागृती आणि समाजोपयोगी उपक्रम राबविण्यासाठी कार्यरत आहे.

मानवी हक्कांविषयी जनजागृती करणे, अन्याय व अत्याचाराविरोधात आवाज उठविणे, महिला व बालकांच्या सुरक्षेबाबत जागृती करणे, ज्येष्ठ नागरिक व दिव्यांगांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधणे, शैक्षणिक व आरोग्यविषयक उपक्रम राबविणे, रक्तदान व आरोग्य तपासणी शिबिरे आयोजित करणे, पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षारोपण करणे तसेच समाजात बंधुता, समानता, न्याय आणि मानवतेची भावना निर्माण करणे, या माध्यमातून संस्था सातत्याने सामाजिक बांधिलकी जपत आहे.

समाजासाठी उत्कृष्ट कार्य करणाऱ्या व्यक्ती आणि घटकांचा सन्मान करून त्यांच्या कार्याला प्रोत्साहन देणे, हा संस्थेच्या सामाजिक कार्याचा महत्त्वाचा भाग आहे. याच भावनेतून स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने पोलिसांचा सन्मान करण्यात आला.

पोलिसांच्या सन्मानासाठी सामाजिक संस्थांनी पुढे यावे

पोलिसांचा सन्मान करण्यासाठी सामाजिक संस्थांनी पुढे येणे ही प्रेरणादायी बाब असल्याचे उपस्थित पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले. पोलिसांचे कर्तव्य, त्याग आणि समाजाच्या सुरक्षिततेसाठी केलेल्या कार्याची दखल घेऊन त्यांचा सन्मान केल्याने पोलिस दलातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना निश्चितच प्रोत्साहन मिळते, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

हा संपूर्ण सन्मान सोहळा संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. राजेश कुंभारे आणि पश्चिम भारत अध्यक्ष श्री. अमोल माने यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला.

“पोलिसांचा सन्मान म्हणजे त्यांच्या कर्तव्याला सलाम”

यावेळी डॉ. किशोर थोरात यांनी सांगितले की, “पोलिस प्रशासन हे समाजाच्या सुरक्षिततेचे महत्त्वाचे आधारस्तंभ आहे. सण-उत्सव असो, आपत्ती असो किंवा कोणतीही परिस्थिती असो, पोलीस आपले कर्तव्य बजावत असतात. त्यांच्या कर्तव्यनिष्ठेला समाजाने सलाम केला पाहिजे. हा सन्मान केवळ व्यक्तींचा नसून त्यांच्या माध्यमातून कर्तव्य, प्रामाणिकपणा आणि सामाजिक जबाबदारीचा सन्मान आहे.”

कर्तव्यदक्ष पोलिसांचा सन्मान…

कायदा-सुव्यवस्थेला बळ…का 

मानवतेच्या सेवेला प्रणाम…

आणि पर्यावरण संवर्धनाचा संकल्प!

सामाजिक कल्याण एवं मानव संरक्षण संघ



थोडे नवीन जरा जुने