MGID Header Code
Code End

चिंचवडच्या दिव्या घोडेकर हिने ४० व्या महाराष्ट्र राज्य अ‍ॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले

 

 ३७ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी गोवा येथे निवड

पिंपरी चिंचवड, ता. १  :  देवगड रत्नागिरी येथे आयोजित ४० व्या महाराष्ट्र राज्य अ‍ॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धा २०२६ मध्ये प्रतिभा ज्युनियर कॉलेज, चिंचवडची विद्यार्थिनी कु. दिव्या घोडेकर हिने महाराष्ट्र राज्यात प्रथम क्रमांक पटकावून घवघवीत यश संपादन केले आहे.

तिने १००० मीटर धावणे , १८ वर्षाखालील ( मुली ) वयोगट या प्रकारात ( ३ मि.०६ .१६) उत्कृष्ट कामगिरी करत संपूर्ण महाराष्ट्रात प्रथम क्रमांक पटकावून सुवर्णपदक मिळवले. या स्पर्धेचे आयोजन महाराष्ट्र अ‍ॅथलेटिक्स असोसिएशनच्या  वतीने करण्यात आले होते.

दिव्याच्या या दैदिप्यमान यशामुळे तिची २७ ते ३० सप्टेंबर २०२६ या कालावधीत गोवा येथे होणाऱ्या ३७ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा २०२६ साठी निवड झाली आहे.

दिव्या घोडेकर ही प्रतिभा ज्युनियर कॉलेज, चिंचवड येथे इयत्ता बारावी कॉमर्स मध्ये शिक्षण घेत आहे. तिचे हे यश तिच्या सातत्यपूर्ण मेहनत, शिस्त, जिद्द आणि प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाचे फलित आहे. तिने प्रतिभा ज्यूनिअर  कॉलेजसह पिंपरी-चिंचवड शहराचे नाव उंचावले असून तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.

या यशाबद्दल कमला एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक सचिव  डॉ . दीपक शहा , खजिनदार डॉ . भूपाली शहा , संचालिका डॉ. तेजल शहा , प्राचार्या डॉ. वनिता कुर्‍हाडे, वरिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. क्षितिजा गांधी , मुख्य प्रशासकीय अधिकारी डॉ . राजेंद्र कांकरीया , क्रीडा विभाग प्रमुख डॉ. शबाना शेख आणि क्रीडा संचालक डॉ. अभय पोतदार समवेत प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी दिव्याचे हार्दिक अभिनंदन केले असून पुढील राष्ट्रीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

थोडे नवीन जरा जुने