पिंपरी-चिंचवड : सामाजिक कल्याण एवं मानव संरक्षण संघाच्या वतीने आयोजित “स्वातंत्र्य दिन सन्मान” उपक्रमांतर्गत पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे महापौर श्री. रवी लांडगे यांचा त्यांच्या विविध सामाजिक, शैक्षणिक, आरोग्यविषयक तसेच पर्यावरणीय कार्यातील योगदानाबद्दल विशेष सन्मान करण्यात आला.
संघाचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष डॉ. किशोर आण्णासाहेब थोरात यांच्या हस्ते महापौर रवी लांडगे यांना सन्मानपत्र व पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारे झाडाचे रोप प्रदान करून गौरविण्यात आले.
पिंपरी-चिंचवड शहराच्या विकासामध्ये सामाजिक, शैक्षणिक आणि आरोग्य क्षेत्रासोबतच पर्यावरण संवर्धनासाठी महापौर रवी लांडगे यांनी घेतलेला विशेष पुढाकार कौतुकास्पद आहे. शहर अधिक हरित, स्वच्छ आणि पर्यावरणपूरक बनविण्यासाठी त्यांच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची दखल घेत हा विशेष सन्मान करण्यात आला.
या सन्मान सोहळ्यासाठी संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. राजेश कुंभारे व पश्चिम भारत अध्यक्ष श्री. अमोल माने यांनी विशेष प्रोत्साहन दिले. तसेच उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष श्री. रवींद्र आळणे आणि महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष श्री. अमित कोकणे यांचे विशेष सहकार्य लाभले.
यावेळी बोलताना डॉ. किशोर थोरात म्हणाले, “पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रशासन आणि सामाजिक संस्थांनी एकत्रितपणे काम करणे आवश्यक आहे. महापौर रवी लांडगे यांच्या सहकार्याने शहरातील आरोग्य, रस्ते, ड्रेनेज, सुरक्षा, पर्यावरण आणि इतर नागरी समस्यांबाबत संघाच्या माध्यमातून सातत्याने पाठपुरावा करून त्या सोडविण्यासाठी प्रयत्न केले जातील.”
सामाजिक कार्य करणाऱ्या लोकप्रतिनिधींच्या सकारात्मक कार्याची दखल घेऊन त्यांना प्रोत्साहन देणे आणि त्याचबरोबर नागरिकांच्या प्रश्नांसाठी प्रशासनासोबत समन्वय साधणे, हा सामाजिक कल्याण एवं मानव संरक्षण संघाचा प्रमुख उद्देश असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.
— सामाजिक कल्याण एवं मानव संरक्षण संघ
महाराष्ट्र राज्य
