MGID Header Code
Code End

सेवा सेतू अभियानात २५७८ ग्राहकांनी घेतला सूर्यघर योजनेचा लाभ

 

६०,८०४ वीजपुरवठा तक्रारींचे निराकरण; ११,९९२ वीजबिल तक्रारी निकाली

पुणे : महावितरणच्या सेवा सेतू अभियानांतर्गत पुणे परिमंडलात प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेच्या २५७८ वीजजोडण्या कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. तसेच ६०,८०४ वीजपुरवठा तक्रारी आणि ११,९९२ वीजबिल तक्रारी निकाली काढण्यात आल्या असून, ग्राहकांच्या नावात बदल करण्याची ४५१२ प्रकरणे पूर्ण करण्यात आली आहेत. वीजपुरवठा यंत्रणा सक्षम करण्यासाठी २३४ रोहित्रेही बदलण्यात आली आहेत.

महावितरणचे कार्यकारी संचालक दिनेश अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पुणे परिमंडलाचे प्रभारी मुख्य अभियंता ज्ञानदेव पडळकर यांच्या नेतृत्वाखाली अभियानाची अंमलबजावणी करण्यात येत आहे.

सूर्यघरयोजनेत २५७८ वीजजोडण्या

प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेअंतर्गत गणेशखिंड मंडलात ७१४, पुणे ग्रामीण मंडलात १११८ आणि रास्तापेठ मंडलात ७४६ वीजजोडण्या कार्यान्वित झाल्या आहेत. मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेअंतर्गत ३१६ सौर कृषी पंप कार्यान्वित करण्यात आले असून, स्वयंपूर्ण महाराष्ट्र आवासीय रूफटॉप सोलार (SMART) योजनेअंतर्गत ११ वीजजोडण्या देण्यात आल्या आहेत.


४४२५ नवीन वीजजोडण्यांची प्रकरणे निकाली

अभियानांतर्गत नवीन वीजजोडण्यांची ४४२५ प्रकरणे आणि ग्राहकांच्या नावात बदल करण्याची ४५१२ प्रकरणे पूर्ण करण्यात आली आहेत. तसेच वीजपुरवठा खंडित होण्याच्या ६०,८०४ आणि वीजबिलासंदर्भातील ११,९९२ तक्रारींचे निराकरण करण्यात आले आहे.

२३४ रोहित्रे बदलली

वीजपुरवठ्याची गुणवत्ता आणि विश्वासार्हता वाढविण्यासाठी पुणे ग्रामीण मंडलात १८१, गणेशखिंड मंडलात ४४ आणि रास्तापेठ मंडलात ९ अशी एकूण २३४ रोहित्रे बदलण्यात आली आहेत. ग्राहकांना सुलभ सेवा देणे, प्रलंबित कामे मार्गी लावणे आणि सौरऊर्जेच्या वापराला प्रोत्साहन देणे, हा या अभियानाचा प्रमुख उद्देश आहे.



थोडे नवीन जरा जुने