MGID Header Code
Code End

पिंपरी विधानसभेत भाजप आमदार अमित गोरखे व आमदार उमा खापरे यांच्या उपस्थितीत पदवीधर-शिक्षक निवडणुकीसाठी विभागवार बैठका


डॉ. स्मिता जाधव आणि कौस्तुभ गावडे यांच्या विजयाचा निर्धार, 23 ऑक्टोबरला होणाऱ्या मतदानासाठी बूथ स्तरावर मायक्रो प्लॅनिंग

पिंपरी चिंचवड  : पुणे विभाग पदवीधर व शिक्षक विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पिंपरी विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाच्या वतीने संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करण्यासाठी विभागवार बैठकांचे आयोजन करण्यात आले होते. आमदार अमित गोरखे आणि आमदार उमाताई खापरे यांच्या प्रमुख उपस्थितीत आढावा बैठका पार पडल्या. या प्रसंगी पिंपरी चिंचवड भाजपा सरचिटणीस वैशालीताई खाडे, आकुर्डी गाव शाहूनगर मंडल अध्यक्ष श्री धरम वाघमारे, प्राधिकरण चिंचवड मंडळ मंडल अध्यक्ष श्री. जयदीप खापरे, संत तुकाराम नगर, कासारवाडी, कराळवाडी मंडल अध्यक्ष श्री .मंगेश धाडगे, पिंपरी गाव, दापोडी, बोपखेल मंडल अध्यक्ष  सौ. अनिता वाळुंजकर, तसेच पक्षाचे पदाधिकारी, निवडणूक प्रभारी आणि प्रमुख कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या बैठकीदरम्यान पुणे पदवीधर मतदारसंघाच्या भाजप-महायुतीच्या अधिकृत उमेदवार स्मिताताई योगेश जाधव आणि पुणे शिक्षक मतदारसंघाचे उमेदवार कौस्तुभ गावडे यांच्या विजयाचा संकल्प करण्यात आला. तसेच निवडणुकीचे नियोजन, बूथ रचना, जबाबदाऱ्यांचे वाटप आणि प्रत्यक्ष मतदार संपर्काची रणनीती यावर सविस्तर चर्चा करण्यात आली.

'मायक्रो मॅनेजमेंट'वर भर

बैठकीत मार्गदर्शन करताना आमदार अमित गोरखे म्हणाले, शिक्षक आणि पदवीधर हे समाजाच्या प्रगतीमध्ये अत्यंत महत्त्वाचे भूमिका बजावतात. त्यामुळे त्यांच्या अडीअडचणी समजून घेणे व त्यांच्याशी सतत संवाद साधणे ही आपली मोठी जबाबदारी आहे. दोन्ही उमेदवारांना पहिल्या पसंतीची जास्तीत जास्त मते मिळवून देण्यासाठी प्रत्येक कार्यकत्याने बूथ स्तरावर जाऊन नियोजनबद्ध काम करणे गरजेचे आहे. मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपने पुणे विभागासह राज्यातील सर्व पाच जागा जिंकण्याचा निर्धार केला आहे. मला पूर्ण विश्वास आहे की, आपल्या सर्वांच्या संघटित ताकदीने आणि कार्यकर्त्यांच्या प्रयत्नांने हा संकल्प नक्कीच पूर्ण होईल. तसेच मतदार संपर्क मोहीम अधिक तीव्र करण्याचे आणि नोंदणीकृत मतदारांना मतदानासाठी प्रवृत्त करण्याचे आवाहन देखील आमदार अमित गोरखे यांनी केले.

23 ऑक्टोबरला होणार मतदान

पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदारसंघासाठी शुक्रवार, 23 ऑक्टोबर 2026 रोजी सकाळी 8:00  ते दुपारी 4:00 या वेळेत मतदान पार पडणार आहे. मतदारसंघातील जास्तीत जास्त नोंदणीकृत पदवीधर व शिक्षक मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावावा.

थोडे नवीन जरा जुने