MGID Header Code
Code End

ज्ञानेश्वरी जयंतीनिमित्त थोरल्या पादुका मंदिरात ज्ञानेश्वरी जयंती उत्साहात साजरी

 


आळंदी (अर्जुन मेदनकर) : श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या जयंतीनिमित्त वडमुखवाडी येथील श्री संत ज्ञानेश्वर महाराज थोरल्या पादुका मंदिरात श्री ज्ञानेश्वरी जयंती व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा भक्तिमय हरिनाम गजराच्या वातावरणात संपन्न झाला.‌ ‌

थोरल्या पादुका देवस्थान ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष ॲड. विष्णू तापकीर यांच्या हस्ते  ज्ञानेश्वरी जयंतीनिमित्त ज्ञानेश्वरी ची पूजा व श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या प्रतिमेची व पादुकांची विधिवत पूजा करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी उपस्थित भाविकांनी पसायदान म्हणत कार्यक्रमाची सांगता केली. यावेळी चंद्रकांत मोरे, साहेबराव काशीद, संपतराव साबळे, शांताराम दाते, शिवाजी तळेकर, रानबा फुलवरे आदी मान्यवर उपस्थित होते.

थोरल्या पादुका मंदिरात 28 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर 2026 या कालावधीत ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्याचे ज्ञानेश्वरी व्यासपीठ विठ्ठल महाराज वानखेडे यांनी भूषविले. पारायण सोहळ्यात अनेक महिला व पुरुष भाविकांनी उत्स्फूर्त सहभाग घेत ज्ञानेश्वरीचे वाचन केले.

ज्ञानेश्वरी जयंतीनिमित्त दररोज पहाटे श्रींची पूजा, काकड आरती, हरिपाठ, महिलांचे भजन व आरती यांसह विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्यामुळे संपूर्ण परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते.

थोडे नवीन जरा जुने